Morjim Fire Incident Dainik Gomantak
गोवा

Morjim News: शॉर्टसर्किटमुळे पर्यटन खात्याची दोन शौचालये खाक

Morjim Fire Incident: स्थानिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना शक्य झाले नाही; २५ लाखांचे नुकसान

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी, ता. १७ (प्रतिनिधी) : टेंबवाडा किनारी भागातील गोवा पर्यटन खात्याच्या दोन शौचालयांना शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने किमान २५ लाखांचे नुकसान झाले.

ही घटना बुधवार, १७ रोजी सकाळी घडली. स्थानिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीचा भडका एवढा मोठा होता की त्यांना ती विझविणे शक्य झाले नाही, त्यामुळे फायबरची असलेली दोन्ही शौचालये जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे पहिल्यांदा दिव्यांगांसाठी असलेल्या खास शौचालयाला आग लागली. स्थानिकांना कळताच त्यांनी पेडणे अग्निशमन दलाला संपर्क केला. परंतु बंब अर्ध्या तासानंतर आल्यामुळे त्याचा काहीही फायदा झाला नाही. त्यामुळे दोन शौचालये पूर्णपणे जळून खाक झाली.

पक्की शौचालये हवीत

ज्या पद्धतीने शॉर्टसर्किट होऊन फायबरची ही शौचालये जळून खाक झाली. त्या नजरेतून आता सरकारने किनारी भागात कॉंक्रिटची पक्की शौचालये उभारावीत, अशी मागणी स्थानिक पंच पवन मोरजे यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Canacona: "..अन्यथा तीव्र आंदोलन छेडू"! काणकोणमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या, काँग्रेस नेते भंडारींची मागणी

Kushavati District: 'कुशावती'तून काणकोणला वगळण्यात यावे! आरजी, आपसह नेत्यांची मागणी; गंभीर गैरसोयींना सामोरे जावे लागण्याचा दावा

मडगावात नववर्षाच्या रात्री चोरट्यांचा धुमाकूळ! SGPDA मार्केटजवळ कार फोडून 90 हजारांचा ऐवज लंपास

Goa Live News: संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते 'आयसीजीएस समुद्र प्रताप' कार्यान्वित!

Cooch Behar Trophy: गोव्याचा निराशाजनक शेवट! मध्य प्रदेशविरुद्ध 3 दिवसांतच पराभूत; चांगल्या सुरुवातीनंतर कामगिरी घसरली

SCROLL FOR NEXT