Morjim News : वझरी जमीन हक्क लढ्याला पंचायतीचा पाठिंबा; समितीची बैठक

Morjim News : एकजुटीने प्रश्न निकाली लावण्याचा ग्रामस्थांचा निर्धार
Morjim
Morjim Dainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी, वझरी गावच्या जमीन मालकी हक्कासंबंधीच्या चळवळीत आता वझरी शेतकरी नागरिक कृती समितीला स्थानिक पंचायतीने पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.

हा संपूर्ण ग्रामस्थांच्या भवितव्याचा विषय आहे आणि त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने ग्रामस्थांसोबत राहणे हे आपले कर्तव्य ठरते, असे वचन सरपंच अनील शेटये यांनी दिले.

समितीच्या रविवारच्या बैठकीत आत्तापर्यंतच्या लढ्याबाबतची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. वझरीकरांच्या एकजुटीने हा विषय निकाली लावणार असल्याचा निर्धार समितीचे अध्यक्ष निलेश शेटये यांनी व्यक्त केला. वझरी शेतकरी नागरिक कृती समितीची महत्वाची बैठक रविवारी श्री सातेरी मंदिर सभागृहात पार पडली. यावेळी समितीचे पदाधिकारी, सरपंच अनील शेटये, पंच सदस्य, पत्रकार संगम भौसुले, किशोर नाईक गावकर, ॲड. प्रसाद शहापूरकर, प्रा. कुलदीप कामत हजर होते.

बैठकीत समितीच्या सदस्यनोंदणीबाबतची माहिती देण्यात आली. प्रत्येक गावकऱ्यांनी या समितीचे सदस्य व्हावे; जेणेकरून जमीन मालकीसंबंधीची कायदेशीर लढाई लढताना त्यांचे योग्य प्रतिनिधीत्व करता येणे शक्य होईल, असे आवाहन केले.

या विषयावर गांवची एकजूट महत्वाची आहे. कुणाच्याही मनांत शंका किंवा प्रश्न असेल तर त्यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून त्याबाबतचे स्पष्टीकरण घ्‍यावे, असेही सांगितले. याप्रसंगी पत्रकार किशोर नाईक गावकर, प्रसाद शहापूरकर यांचा सन्मान करण्यात आला.

Morjim
Dr N Kalaiselvi यांची CSIR आणि DSIR च्या महासंचालक पदी नियुक्ती; प्रथमच एका महिलेला संधी

दत्तात्रय देशपांडे यांना आदरांजली

स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रय देशपांडे यांनी वझरी गावच्या जमीन मालकीसंबंधीच्या विषयावर बरेच काम केले होते. त्यांनी १९६४ साली या लढ्याबाबतची एक पुस्तिका प्रसिद्ध केली होती. ही पुस्तिका म्हणजेच या लढ्याच्या इतिहासाचा महत्त्वाचा दस्तऐवज ठरला आहे.

वझरीकरांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे त्यांना तुरूंगवासही भोगावा लागला. त्यांनी वझरी गावावर केलेल्या उपकारांची परतभेट होऊ शकत नाही. या बैठकीत ग्रामस्थांच्यावतीने त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com