Goa CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: गोविंद गावडे यांच्यानंतर आणखी दोन मंत्र्यांंना मिळणार नारळ; याच आठवड्यात होणार मंत्रिमंडळात फेरबदल?

Goa Cabinet Reshuffle: गावडे यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर आता आणखी दोन मंत्र्यांना देखील मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे.

Pramod Yadav

BJP Goa news:पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे असलेल्या आदिवासी कल्याण खात्यात भ्रष्टाचारावराचा आरोप केल्यानंतर गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. पक्ष शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत भाजपने गावडेंना मंत्रिपदावरुन हटवले. उटा संघटनेचा विरोध झुगारुन पक्षाने ही कारवाई केली. गावडेंपाठोपाठ आता आणखी दोघांना मंत्रिमंडळातून नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. रखडलेल्या मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर हा बदल अपेक्षित आहे.

प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात कला, संस्कृती तसेच क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावर टीका केली. श्रमशक्ती भवनच्या खाली कंत्राटदाराकडून पैसे घेऊन फाईल मंजूर केल्या जातात असा आरोप गावडेंनी केला होता.

गावडेंच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कारवाईचा इशारा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि मुख्यमंत्री सावंत यांनी दिला होता. गावडेंना हटवल्यास परिणाम भोगावे लागतील असा इशारा देऊन सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न गावडे समर्थकांनी केला पण, हा दबाव झुगारुन गावडेंना बाहरेचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

गावडे यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर आता आणखी दोन मंत्र्यांना देखील मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. हे दोन मंत्री कोण याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, शुक्रवारपर्यंत दोन मंत्र्यांना हटवले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

एवढेच नव्हे तर रखडलेला फेरबदलचा प्रश्न देखील याच आठवड्यात मार्गी लागण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी देखील गावडे यांच्या गच्छंतीनंतर पक्ष वाढीसाठी येत्या आठ दिवस मोठे निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत.

गोवा मंत्रिमंडळाच्या फेरबदलाचा विषय गेल्या दोन वर्षापासून रखडला आहे. निलेश काब्राल यांच्या जागी आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद दिल्यानंतर मंत्रिमंडळात कोणताही मोठा बदल झाला नाही. दरम्यान, गावडे यांच्यावरील कारवाईनंतर आणखी दोन मंत्र्यांना हटवून तीन नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दिगंबर कामत, संकल्प आमोणकर आणि मायकल लोबो अशा तिंघांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपासून आजारी असणारे मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते दिल्लीतच विश्रांती घेत आहेत. वयोमान अधिक असल्याने सिक्वेरा यांना मंत्रिमंडळातून हटवले जाऊ शकते अशी चर्चा आहे. दरम्यान, आणखी कोणाला नारळ दिला जाईल याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. सभापती रमेश तवडकर देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत असून, त्यांना संधी दिली जाणार का? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shocking: क्रिकेट जगतात खळबळ! ड्रग्जच्या व्यसनामुळं दिग्गज क्रिकेटपटूची कारकीर्द उद्ध्वस्त, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कायमची 'एक्झिट'

Chhattisgarh Train Accident: छत्तीसगढमध्ये मोठा रेल्वे अपघात! लोकल ट्रेनची मालगाडीला जोरदार धडक,10 जणांचा मृत्यू, अनेक जखमी; प्रवाशांची धावपळ VIDEO

Vaibhav Suryavanshi Record: 9 चौकार, 4 षटकार... 'टेस्ट'मध्ये 'टी-20' सारखा धमाका, 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीनं पुन्हा इतिहास रचला

Pirna Murder Case: पीर्ण खून प्रकरणी कोलवाळ पोलिसांना मोठं यश, दोन आरोपींनी केले आत्मसमर्पण; लवकरच होणार मोठा उलगडा?

VIDEO: बाणावली बीचवर 'डॉल्फिन'चं दर्शन! मच्छीमार पेले यांनी शेअर केलेला व्हिडिओ Viral, समुद्रातील अद्भुत दृश्य एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT