Accident in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Accident : गोव्यात 12 तासात 2 भीषण अपघात

चतुर्थीच्या तोंडावर गोव्यात रस्ते सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आदित्य जोशी

Goa Accident : ऐन सणासुदीत गोव्यात पुन्हा एकदा अपघातांचं सत्र सुरु झालं आहे. साखळीजवळच असलेल्या विठ्ठलापूर परिसरात मॅगी घेऊन जाणारा कंटेनर कलंडल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या 12 तासांमध्ये गुळे काणकोणमध्ये बांबू घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाचा बळी गेल्या असून 6 ते 7 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे चतुर्थीच्या तोंडावर गोव्यात रस्ते सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

गुळे काणकोण येथे बांबूंनी भरलेला ट्रक कलंडल्याने झालेल्या अपघातात एका 32 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. हा कामगार आसाम येथील असून तो बांबूंच्या ढिगाऱ्याखाली अडकला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. मिळालेल्या माहितीनुसार या ट्रकात चालक व वाहक यांच्यासह एकूण 9 जण होते. त्यापैकी सात कामगार ट्रकच्या हौदात होते. त्यातील 5 किरकोळ जखमी झाले तर एक गंभीर जखमी झाला.

साखळीजवळ असलेल्या विठ्ठलापूर परिसरात सोमवारी संध्याकाळी कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. हा कंटेनर आधी विजेच्या खांबाला धडकला आणि त्यानंतर रस्त्याशेजारी असलेल्या घरावर कोसळला. या अपघातात चालकाला किरकोळ इजा झाली आहे.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डिचोलीजवळील नेस्ले कंपनीतून हा कंटेनर मॅगी घेऊन निघाला होता. मात्र सर्वण विठ्ठलापूरजवळ पोहोचताच चालकाचं कंटेनरवरील नियंत्रण सुटलं. हा कंटेनर आधी रस्त्याशेजारी असलेल्या विजेच्या खांबाला धडकला आणि त्यानंतर एका घरावर कोसळला. अपघातात चालकाला किरकोळ इजा झाली असून घराचं मात्र मोठं नुकसान झालं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT