Goa Accident : गुळे काणकोण येथे बांबू नेणारा ट्रक कलंडला; एकाचा मृत्यू

ट्रकमध्ये एकूण सात कामगार होते अशी माहिती मिळाली असून त्यातील 5 जणांना किरकोळ जखमा झाल्या.
Truck Accident in Canacona
Truck Accident in Canacona Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Accident : बांबू घेऊन जाणारा ट्रक गुळे काणकोण येथे हमरस्त्यावर आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उलटला. या ट्रकमध्ये एकूण सात कामगार होते अशी माहिती मिळाली असून त्यातील 5 जणांना किरकोळ जखमा झाल्या. एका गंभीर जखमी झालेल्या कामगाराला बांबूच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यास अग्निशमन दलाला यश आले. मात्र एक कामगार ढिगाऱ्याखाली अडकून पडला होता.

गुळे काणकोण येथे बांबूंनी भरलेला ट्रक कलंडल्याने झालेल्या अपघातात एका 32 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. हा कामगार आसाम येथील असून तो बांबूंच्या ढिगाऱ्याखाली अडकला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. मिळालेल्या माहितीनुसार या ट्रकात चालक व वाहक यांच्यासह एकूण 9 जण होते. त्यापैकी सात कामगार ट्रकच्या हौदात होते. त्यातील 5 किरकोळ जखमी झाले तर एक गंभीर जखमी झाला.

Truck Accident in Canacona
Goa Hotspot : गोवा होणार हायटेक; 10 हजार ठिकाणी लवकरच हॉटस्‍पॉट सेवा

या अपघातामुळे कारवार - गोवा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रक बांबू घेऊन काणकोणच्या दिशेने निघाला होता. पडत असलेल्या पावसामुळे ट्रक चालकाचा रस्त्याचा अंदाज चुकल्यामुळे हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Siolim Woman Investment Fraud
Goa Man ChatGPT Viral Video
Goa CM Pramod Sawant accident help
Bori culvert railing damage
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com