Goa Accident Death Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: मद्यपी चालकामुळे टेम्‍पो ओहोळात उलटून 2 ठार

Goa Accident Death: पोलिसांनी राज्यात ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’विरोधात मोहीम उघडली असली, तरी मद्य पिऊन वाहन चालवण्याचे प्रकार काही थांबलेले नाहीत.

दैनिक गोमन्तक

Goa Accident Death:

पोलिसांनी राज्यात ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’विरोधात मोहीम उघडली असली, तरी मद्य पिऊन वाहन चालवण्याचे प्रकार काही थांबलेले नाहीत. बेंदुर्डे-केपे येथे शनिवारी रात्री मालवाहू टेम्पोला झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. हे दोघे नात्याने सून आणि सासरे आहेत. टेम्पोचालकाने मद्यपान केल्याचे उघड झाले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

कुंकळ्ळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली. अपघातग्रस्त मिनी टेम्पो (एमएच-०८-एपी-६३४९) काजू बियांनी भरलेली पोती मडगावकडे नेत होता. या अपघातामधील हक्कू सतालिया आणि देवराज सतालिया यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे दोघेही नात्याने सून आणि सासरा असून ते फुगे विकण्याचे काम करीत होते, अशी माहिती मिळाली. टेम्पोत बसलेल्यांमध्ये सहा पुरुष, पाच लहान मुले आणि तीन महिलांचा समावेश होता.

- टेम्पोला हात केला अन्...

राकेश गोरे हा मंगळूरहून काजू बिया घेऊन गोव्याकडे येत असता, बाजारात फुगे विकणाऱ्या एकाच कुटुंबातील या १४ सदस्यांनी त्याच्या टेम्पोला उडुपी येथे हात केला आणि थांबविले. त्यांनी आपल्याला गुजरातला जायचे आहे, असे सांगितले. परंतु राकेशने आपण गुजरात नाही, तर गोव्याला जात असल्याचे सांगितले, तरीही त्यांनी आम्हाला पुढे कुठेही सोडले तरी चालेल, असे सांगून ते टेम्पोत बसले आणि बेंदुर्डे येथे या टेम्पोला अपघात झाला.

मुख्यमंत्र्यांनी थांबविला ताफा : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे शनिवारी रात्री काणकोणहून कार्यक्रम आटोपून घरी परतत होते. त्यांच्यासोबत समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई आणि माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर हेसुद्धा होते. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनीही मदतकार्यात सहभाग घेतला. जखमींना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत मुख्यमंत्री तेथेच होते. यावेळी सुभाष फळदेसाई यांनीही दरीत उतरून जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये नेले.

जखमी प्रवाशांची नावे अशी...

या अपघातात अरविंद, संतोष, राहुल, मुक्ता, किरण, विक्रम, राणी, अर्णव, युवराज आणि अशोक चव्हाण (वाहक) यांच्यासह १२ जण जखमी झाले असून त्यांच्यावर बाळ्ळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, मडगाव जिल्हा हॉस्पिटल आणि गोमेकॉ येथे उपचार सुरू आहेत.

गोव्याच्या हद्दीत लागले दारूचे वेध

या टेम्पोत उडुपी (कर्नाटक) येथे काही प्रवासी बसले. टेम्पो गोव्याच्या हद्दीत पोहोचताच चालक राकेश गोरे (मूळ रत्नागिरी) याने गाडी थांबवून दारू पिल्याचे उघडकीस आले. चालक दारूच्या नशेतच वाहन चालवत असता, बंदुर्डे-केपे येथे ओहोळावरील पुलाच्या कठड्याला धडक दिल्यानंतर टेम्पो दहा मीटर खोल दरीत कोसळल्याने टेम्पोत मागे बसलेल्या प्रवाशांवर काजू बियांनी भरलेली जड पोती पडली. त्याखाली दबून ते गंभीर जखमी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT