Kadamba Bus Accident Dainik Gomantak
गोवा

दुचाकीला वाचवण्याच्या नादात दोन कदंब बस धडकल्या

अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याने त्यांना जवळच असलेल्या गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे.

आदित्य जोशी

पणजी : पणजीजवळच असलेल्या बांबोळी परिसरात आज सोमवारी दोन कदंब बसचा विचित्र अपघात पाहायला मिळाला. दुचाकी आणि कारला वाचवण्याच्या नादात कदंब चालकाने मारलेल्या ब्रेकमुळे दोन बस धडकून अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही बसचं मोठं नुकसान झालं आहे.

बांबोळी परिसरात कदंबच्या इलेक्ट्रिक बस आणि साध्या बसचा अपघात झाला आहे. एसी बसच्या चालकाने दिलेल्या माहितीनुसार बससमोर अचानक एक दुचाकी आणि कार घुसले. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी चालकाने ब्रेक मारला. मात्र अचानक ब्रेक मारल्याने मागून येणारी साधी कदंब बस एसी बसला धडकली. यात साध्या कदंब बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून एसी बसचंही नुकसान झालं आहे.

बस अपघातात अनेक प्रवाशांना किरकोळ इजा झाली. मात्र अपघातस्थळावरुन रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकाही उपलब्ध न करुन दिल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला. मात्र दुसरीकडे प्रवासी स्वत:हूनच उतरुन जवळच असलेल्या रुग्णालयात गेल्याचं नॉन एसी कदंबच्या चालकाचं म्हणणं आहे. अपघातात 3-4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गोमेकॉमध्ये उपचार सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT