Rain in goa 
गोवा

चोवीस तासांत २ इंच पाऊस

Vilas Ohal

विलास ओहाळ

पणजी : 

राज्य वेधशाळेने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यभरात गेल्या चोवीस तासांत दोन इंच पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात ११७ इंच पाऊस नोंदला गेला असून, वेधशाळेने मंगळवारप्रमाणेच आजही राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पर्जन्यवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे. तर इतर भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल, असे म्हटले आहे.

राज्यात काही भागात पाऊस ज्या प्रकारे विश्रांती घेऊन पडत आहे, त्यावरून श्रावणातील सरींचीच आठवण होत आहे.

श्रावण महिना सुरू झाल्यानंतर ज्याप्रकारे सरी कोसळतात, तसाच पाऊस सध्या हजेरी लावत आहे. वेधशाळेने काही भागात ठिकाणी मुसळधार वृष्टी होण्याची शक्यता मंगळवारीही वर्तविली होती.

आजही त्यांनी त्याचप्रकारे शक्यता वर्तविली आहे. मागील चोवीस तासांत राज्यात २ इंच पाऊस पडल्याचे नोंदले गेले आहे.

वेधशाळेकडे विविध ठिकाणी सेंटीमीटरमध्ये नोंदलेला पाऊस : वाळपई ९, साखळी ७, केपे व सांगे प्रत्येकी ५, म्हापसा व जुने गोवे प्रत्येकी ४, पेडणे, फोंडा व पणजी प्रत्येकी ३ आणि काणकोण २ तर मडगाव १.

संपादन : महेश तांडेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पुण्याच्या मैदानात 'रॉयल' एन्ट्री! IPL 2026 साठी गहुंजे स्टेडियम सज्ज; 'या' संघाचे सर्व होम मॅचेस पुण्यात रंगणार

Viral Video: सचिन तेंडुलकरची लेक 'सारा'च्या हातात बिअरची बाटली? गोव्यातील रस्त्यावरुन फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Goa Politics: ‘क्रॉस व्होटिंग’मध्ये कॉंग्रेसचाच हात! आमदार सिल्वा यांचा आरोप; विजय मिळाला नसला तरी लढत दिल्याचा दावा

Bodgeshwar Jatra: "पूर्वी म्हापशात जत्रेचा फलक पाठीवर घेऊन, ढोल-ताशा वाजवत दवंडी पिटली जायची"; बोडगेश्वर जत्रेचा इतिहास

Tillari Canal: ‘तिळारी’च्या पाण्याचा होणार प्रभावी वापर! सल्लागार नियुक्तीची निविदा; 64 गावांचे सखोल विश्लेषण केले जाणार

SCROLL FOR NEXT