Mopa International Airport | Goa Marathi News | Goa News Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport : पर्रीकर की बांदोडकर?; मोपा विमानतळ नामकरणावरून दोन मतप्रवाह

नव्याने सुरू होत असलेल्या आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळाला नाव कोणाचे द्यावे?, यावरून वादाला तोंड फुटले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mopa Airport : नव्याने सुरू होत असलेल्या आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळाला नाव कोणाचे द्यावे?, यावरून वादाला तोंड फुटले आहे. काहींनी मते गोव्याचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जाणारे पहिले मुख्यमंत्री दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव असावे, तर गोव्याचे आधुनिक शिल्पकार म्हणून परिचित असलेले दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. यामुळे पर्रीकर की बांदोडकर?, यावरून दोन मतप्रवाह व्यक्त होत आहेत.

‘पर्रीकर आणि बांदोडकर या दोघांचेही योगदान महत्त्वाचे आहे. पण पर्रीकरांचेच नाव योग्य आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे. मात्र, सरकारचा निर्णय आपल्याला मान्य असेल, असे मत माजी आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी व्यक्त केले. तर दुसरीकडे ‘पर्रीकरांच्या नावाला माझा वैयक्तिक विरोध नाही. तरी पण गोव्याचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जाणारे भाऊसाहेब बांदोडकर यांचेच नाव असावे, अशी भूमिका समाज कार्यकर्ते प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी मांडली. दरम्यान, ‘मोपा’ला कोणतेही नाव दिले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर गोवा ग्रीनफिल्ड मोपा विमानतळ असेच ओळखले जाण्याची शक्यता आहे.

बांदोडकरांनी गोव्याची अस्मिता टिकवण्याचा प्रयत्न केला. विमानतळाला भाऊसाहेबांचे नाव देण्याचे वचन पर्रीकरांनी यापूर्वी पेडणेकरांना दिले होते. त्याचे आता पालन व्हायला हवे. त्यामुळेच ‘मोपा’ला बांदोडकरांचे नाव देऊन त्यांना अजरामर करावे, अशी मागणी प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली आहे.

तर ‘मोपा’ला पर्रीकरांचेच नाव हवे. गोव्यासाठीच नव्हे तर देशासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. ते असते तर विमानतळावरील नोकऱ्यांत अन्याय झाला नसता. विमानतळाला ज्यांच्या जमिनी गेल्यात, त्यांना वंचित ठेवण्यात येऊ नये, अशी मागणी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT