Ponda Robbery
Ponda Robbery Dainik Gomantak
गोवा

Ponda Robbery : छंदापोटी गोव्यात लुटालूट; फोंड्यात चोरीप्रकरणी महाराष्ट्रातील दोघांना बेड्या

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda Robbery : फोंड्यातील तीन चोऱ्यांप्रकरणांचा छडा पोलिसांनी अवघ्या 24 तासात लावत दोघा चोरट्यांना गजाआड केलं आहे. या चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड मिळून एकूण अकरा लाखांवर डल्ला मारला होता. दोन्ही संशयित मूळ महाराष्ट्रातील असून एकाचे नाव दयानंद रवी शेट्टी (वय 37) असे असून तो सायन - मुंबई येथील रहिवासी आहे, तर दुसरा चोरटा संजय हनुमंत जमादार हा उमरगा - उस्मानाबाद महाराष्ट्रातील रहिवासी आहे.

फोंड्यातील अंत्रुजनगर हाऊसिंग सोसायटीतील विठ्ठल प्रभू यांच्या फ्लॅटचा दरवाजा तोडून आतील कपाट फोडून चार लाखांचे दागिने तसेच दीड लाख रुपयांची रोकड पळवण्यात आली होती. दुसऱ्या एका घटनेत याच दिवशी झिंगडीमळ - कुर्टी येथील विराज पाटील यांच्या फ्लॅटमध्येही अशी चोरी करून पाच लाख रुपयांचे दागिने आणि पाच हजार रुपयांची रोकड पळवली गेली होती. तर तिसऱ्या घटनेत झिंगडीमळ - कुर्टीतीलच पुंडलिक गावडे याच्या फ्लॅटमध्ये चोरी करून दीड हजार रुपयांची रोकड कपाट फोडून पळवली होती.

फोंडा पोलिस स्थानकात यासंबंधीची तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस उपअधीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. चोरी झालेल्या ठिकाणचे वाटेवरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. अन्य काही चौकशाही झाल्या, त्यात दोन्ही चोरटे पणजीच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी संशयित दयानंद रवी शेट्टी आणि संजय हनुमंत जमादार या दोघांना पणजीतील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले.

या चोरट्यांकडून दहा लाख रुपयांचे दागिने तसेच सहा हजार रुपयांची रोकड ताब्यात घेण्यात आली आहे. दोन्ही चोरट्यांपैकी दयानंद शेट्टी हा सायन - मुंबईतील रहिवासी असून तो चित्रपट तसेच मालिकांसाठी स्पॉटबॉय म्हणून काम करीत होता, तर दुसरा चोरटा संजय जमादार हा उमर्गा - महाराष्ट्रात वडापाव गाडा चालवतो. दोघेही मित्र असून त्यांनी गोव्यात येऊन चोरीचा डाव आखला होता.

दोघांनाही अनेक छंद असल्याचेही उघड झाले आहे. चोऱ्या करण्यासाठी त्यांनी फोंड्यात आधी टेहळणीही केली होती, त्यामुळे कुठला फ्लॅट बंद आहे, त्याची माहिती घेतल्यांतरच या दोन्ही चोरट्यांनी दिवसाढवळ्या या धाडसी चोऱ्या केल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco News : सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण कोळशासाठी : कॅ. विरियातो फर्नांडिस

Cashew Farmer : निवडणुकीच्या धामधुमीत काजू उत्‍पादक वाऱ्यावर; उत्पादन कमी १६ हजार जणांना फटक

Heavy Rainfall in UAE: मुसळधार पाऊस अन् जोरदार वादळाने UAE पुन्हा बेहाल; उड्डाणे रद्द, इंटरसिटी बस सेवाही ठप्प

Loksabha Election 2024 : शिरोडा मतदारसंघातून धेंपेंना मताधिक्य देणार : मंत्री सुभाष शिरोडकर

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

SCROLL FOR NEXT