Goa Gambling Case Dainik Gomantak
गोवा

Goa News: ऑनलाईन जुगारात झाला मोठा लॉस, उसने घेतलेले पैसेही गमावले; नैराश्यात गेलेल्या 19 वर्षीय मुलाने संपवले आयुष्य

Goa Tragic Death News: जुगार खेळून झालेले नुकसान भरुन काढणे आणि उसने घेतले पैसे परत देण्याचा त्याचा विचार होता पण, त्याचा आणखी लॉस झाला आणि तो नैराश्यात गेला.

Pramod Yadav

केरी: ऑनलाईन जुगारात मोठे नुकसान झाल्याने नैराश्यात गेलेल्या १९ वर्षीय मुलाने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आर्थिक नैराश्यातून केरी येथील मुलाने आत्महत्या केलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, केरी येथील १९ वर्षीय मुलाने ऑनलाईन जुगारात स्वत:जवळील सर्व पैसे गमावले. त्यानंतर जुगार खेळण्यासाठी त्याने सुरुवातीला कुटुंबीय नंतर मित्र आणि नातेवाईंकांकडून पैसे घेतले. जुगार खेळून झालेले नुकसान भरुन काढणे आणि उसने घेतले पैसे परत देण्याचा त्याचा विचार होता पण, त्याचा आणखी लॉस झाला आणि तो नैराश्यात गेला.

 मोठ्या प्रमाणावर झालेले आर्थिक नुकसान आणि त्यातून आलेले नैराश्य यामुळे १९ वर्षीय मुलाने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली. याप्रकरणी मार्दोळ पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, राज्यात ऑनलाईन जुगाराच्या आहारी गेलेल्या तरुणाची संख्या वाढत आहे. याबाबत विधानसभेत देखील चिंता व्यक्त करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Municipal Election: पालिका निवडणुकांसाठी प्रभाग राखीवता तातडीने जाहीर करा, अन्‍यथा न्यायालयात जाणार; विजय सरदेसाईंचा इशारा

'सीआरझेड'मधून मासेमारांना दिलासा द्या, रापोणकर 'सी फूड फेस्टिव्हल'मध्ये मच्छीमार पेलेंची मागणी

Goa Education: पहिली ते आठवीपर्यंतच्‍या प्रश्‍‍नपत्रिका 'एससीईआरटी'च तयार करणार! परिपत्रक लवकरच जारी

WPL 2026: जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स सज्ज; सराव करण्यासाठी खेळाडू गोव्याच्या मैदानात Watch Video

Olive Ridley: गालजीबाग किनाऱ्यावर 'रिडले'ची 109 अंडी, केंद्रात उबवण्यासाठी लागणार 48 ते 58 दिवस

SCROLL FOR NEXT