Uttar Pradesh Crime News
Samir Shaikh Murder News| Goa Murder CaseDainik Gomantak

Goa Murder Case: मित्राने ई-मेलकरून दिल्लीला बोलवले होते, दिल्लीतून समीर शेख गाझियाबादला का गेला? खूनाचे गूढ वाढले

Uttar Pradesh Crime News: समीर शेख ३० मे पासून बेपत्ता होता, याप्रकणी त्याच्या कुटुंबीयांनी कुडचडे पोलिस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
Published on

केपे: गोव्यातील तरुणाची गाझियाबाद, उत्तर प्रदेश येथे निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (१२ जून) उघडकीस आली. बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाची हत्ता केल्याचे वृत्त अचानक समोर आल्याने अनेक शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत.

शिवाय मित्रांने दिल्लीत बोलावले असताना समीर शेख गाझियाबादला का गेला? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

समीर शेख (वय ३२, रा. सवार्डे – गुड्डेमळ) यांचा गाझियाबाद येथील एका खोलीतील बाथरुममध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. चादर आणि चटईत त्यांचा मृतदेह गुंडाळून ठेवला होता.

याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, यातील दोन संशयित अद्याप फरार आहेत. समीर शेख ३० मे पासून बेपत्ता होता, याप्रकणी त्याच्या कुटुंबीयांनी कुडचडे पोलिस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

Uttar Pradesh Crime News
बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गोव्यातील व्यक्तीचा उत्तर प्रदेशमध्ये खून, फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

पुण्यात एका खासगी संस्थेत समीर शेख काम करत होता. ईदच्या सणासाठी ते २५ मे रोजी सवार्डे – गुड्डेमळ येथे आला होता. त्याच्या एका मित्राने ई-मेलद्वारे संपर्क साधून त्याला दिल्लीला येण्यास सांगितले.

कुटुंबीयांना सांगून समीर दिल्लीला रवाना झाला पण दिल्लीतून तो उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे दाखल झाला. येथेच त्याचा एका खोलीत खून करण्यात आला. खोलीच्या बाथरुमध्ये चादर आणि चटईत त्याचा मृतदेह गुंडाळून ठेवण्यात आला होता.

Uttar Pradesh Crime News
Goa Landslide: पावसाळ्याच्या सुरुवातीलाच गोव्यात दुर्घटना, दरड कोसळून दोन घरांचे नुकसान

पोलिसांना समीरचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. दिल्लीतून समीर रॅपिडो टॅक्सी बूक करुन गाझियाबादमध्ये आला होता. समीरने एकाला २५० रुपयांचे ऑनलाईन पेमेंट देखील केले होते.

यावरुनच पोलिसांनी संशयितांना अटक करण्यास सुरुवात करत दोघांच्या मुसक्या अवळल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणातील गुंता वाढला असून, शेख गाझियाबादला का गेला होता? त्याचा खून का करण्यात आला? याप्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com