Porvorim Police Arrested 19 year old boy Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News : विदेशी महिलेचा मोबाईल हिसकावणाऱ्या 19 वर्षीय युवकाला अटक

पर्वरी पोलिसांची कारवाई

Rajat Sawant

Goa Crime News : पिळर्ण येथील एका परदेशी नागरिक महिलेचा मोबाईल हिसकावणाऱ्या एका संशयितास पर्वरी पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी संशयिताकडून 1 लाख 20 हजारांचा मोबाईल हस्तगत करण्यात आला. पर्वरी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, परदेशी नागरिक महिला व तिचे पती पिळर्ण ते बेती प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान डिव्हो दुचाकीवरुन आलेल्या एका युवकाने महिलेच्या हातातील फोन हिसकावून घेतला व पसार झाला.

याबाबतची तक्रार इस्रायल नागरिकाने पोलिसांत नोंदविली. विश्वसनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितावर तांत्रिक पाळत ठेवत आज अटक केली. तौफिक शेख, (19) रा. पैठण, बार्देश असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. यावेळी संशयिताकडून 1 लाख 20 हजारांचा मोबाईल हस्तगत करण्यात आला.

सदर कारवाई पर्वरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विद्वेश कर्पे, पीआय अनंत गावकर, पीएसआय सीताराम मलिक, पीएसआय प्रतीक भाटप्रभू, कॉन्स्टेबल नितेश गौडे, सिद्धेश नाईक आणि योगेश शिंदे यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT