Reliance Development League Football : एफसी गोवाची अपराजित घोडदौड; चर्चिल ब्रदर्सचा सहावा पराभव

चर्चिल ब्रदर्सला नमविले, सेझा, धेंपो क्लबचेही विजय
ARA FC and FC Goa
ARA FC and FC GoaDainik Gomantak

एफसी गोवा संघाने रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेच्या गोवा विभागीय फेरीत अपराजित घोडदौड कायम राखताना गुरुवारी चर्चिल ब्रदर्सला 1-0 फरकाने हरविले. सामना नागोवा पंचायत मैदानावर सकाळच्या सत्रात झाला.

आपला वाढदिवस शानदार गोलने साजरा करताना बदली खेळाडू ज्योवियल डायस याने ५३व्या मिनिटास अचूक लक्ष्य साधले. त्यामुळे एफसी गोवास स्पर्धेतील सातवा विजय नोंदविता आला. त्यांचे नऊ सामन्यानंतर सर्वाधिक 23 गुण झाले आहेत.

चर्चिल ब्रदर्सला सहावा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे नऊ सामन्यातून त्यांचे पाच गुण कायम राहिले. सामन्याचा अखेरचा टप्पा तणावग्रस्त ठरला. त्यामुळे रेफरीस पाच खेळाडूंना यलो कार्ड दाखवावे लागले.

ARA FC and FC Goa
Goa Ferry Boat : राज्यातील 'या' मार्गावरील फेरीबोट सेवा 15 दिवसांसाठी बंद

अन्य लढतीत शिरसई मैदानावर चैतन दाभोळकर याने 47व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे सेझा फुटबॉल अकादमीने वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबला 1-0 असे हरविले. सेझा अकादमीचा हा तिसरा विजय ठरला. त्यामुळे त्यांचे नऊ लढतीनंतर 12 गुण झाले. दुसऱ्या पराभवामुळे 17 गुणांसह वेळसाव संघ दुसऱ्या स्थानी कायम राहिला.

एला-जुने गोवे येथे धेंपो स्पोर्टस क्लबने साळगावकर एफसीवर 3-0 फरकाने मात केली. धेंपो क्लबने नऊ सामन्यांत तीन विजयासह गुणसंख्या 12 वर नेली, तर सहाव्या पराभवामुळे साळगावकर संघाचे पाच गुण कायम राहिले.

ARA FC and FC Goa
Bandodkar T-20 League : साळगावकर क्लबने जिंकला बांदोडकर करंडक; 63 धावांनी विजय

एआरए संघाचा चमकदार विजय

द्वितीय विभाग आय-लीग फुटबॉल स्पर्धेच्या ‘ड’ गटात गुरुवारी नागोवा पंचायत मैदानावर संध्याकाळच्या सत्रात अहमदाबादच्या एआरए एफसीने एफसी गोवा (राखीव) संघावर 3-0 फरकाने चमकदार विजय मिळविला.

विजयी संघाच्या नरोहरी श्रेष्ठ याने अनुक्रमे नवव्या व साठाव्या मिनिटास असे एकूण दोन, तर मनवीर सिंगने पाचव्या मिनिटास एक गोल केला. स्पर्धेतील पाचव्या विजयामुळे सात सामने खेळल्यानंतर एआरए एफसीचे 17 गुणांसह अग्रस्थान भक्कम ठरले.

एफसी गोवास पाचवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांच्या चार गुणांत फरक पडला नाही. ‘ड’ गटात बंगळूर येथे झालेल्या आणखी एका सामन्यात अंबरनाथ युनायटेडने हैदराबाद एफसी (राखीव) संघाला 3-0 असे नमविले आणि चौथ्या विजयासह 14 गुण नोंदवून दुसरा क्रमांक मिळविला. हैदराबाद संघाच्या खाती पाचव्या पराभवामुळे एक गुण कायम राहिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com