19-year-old girl's 'app' is worth 600 crores goa Dainik Gomantak
गोवा

Goa News: 19 वर्षीय मुलीच्या ‘ॲप’चे मूल्य 600 कोटी

‘हॅपी वुमन’ : महिलादिनी अनावरण; गोमंतकीय निकोलचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान

दैनिक गोमन्तक

पणजी: एकोणीस वर्षीय निकोल फारिया ही तशी दिसायला शाळकरी मुलगी. मुंबईत बायोटेक्नॉलॉजीमध्ये दुसऱ्या वर्षाचे शिक्षण ती घेते. परंतु तिने बनविलेला महिलांसाठीचा ॲप तब्बल 600 कोटी मूल्याचा आहे. हा अभिनव स्टार्टअप सुरू केल्याबद्दल नुकताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते तिचा सन्मानही करण्यात आला. ‘हॅपी वुमन’ या नावाच्या ‘ॲप’चे अधिकृतरित्या महिलादिनी (8 मार्च रोजी) अनावरण होणार आहे. मुंबईत शिक्षण घेत असली तरी ती गोव्याची असून नावेलीत राहाते.

(19-year-old girl's 'app' is worth 600 crores goa)

‘या ॲपमध्ये महिलांना उपयुक्त ठरणारी सर्व प्रकारची माहिती आणि त्यांच्या प्रश्‍नांची सारी उत्तरे दिली आहेत. एका ठिकाणी महिलांचे सारे प्रश्‍न सोडवून देण्याची ही जणू गुरुकिल्लीच आहे,’ असे निकोल आज ‘गोमन्तक’शी संवाद साधताना म्हणाली.

कोविड महामारीच्या काळात अनेकांप्रमाणेच आपल्या आईबरोबर निकोलला घरातच बंदिस्त राहावे लागले. ‘त्यावेळी माझी आई वैतागली होती. माझ्या वडिलांना दोष देत, ‘आपल्याकडे तसा बँक अकाऊंटही नाही’, हे मला नेहमी सुनावत होती. माझ्या मनात त्यावेळी नेमका तो प्रश्‍न आला, जो आज अनेक महिलांना लागू पडतो.

महिलांचे अनेक प्रश्‍न सोडविणारी यंत्रणा आपल्याकडे हवी. त्यात त्यांच्या प्रत्येक प्रश्‍नाला चुटकीसरशी उत्तर मिळायला हवे. ही माहिती देऊन निकोल म्हणाली, कोविडचा उद्रेक झाला तेव्हा मी बारावीत होते. वर्ग ऑनलाईन सुरू होते. मलाही संगणकावर काम करताना महिलांचे प्रश्‍न सोडविणारे आणि त्यांचे दुःख संपविणारे ॲप शोधून काढण्याची स्फूर्ती या काळातच मिळाली.

..अशी झाली 600 कोटींची गुंतवणूक :

मी ॲप बनविल्यानंतर जवळच्या अनेकांकडे बोलले. माझे वडीलही मला सतत प्रोत्साहन देत होते. त्यातूनच उद्योजक अजॉयकांत रुहिया यांनी माझ्याशी संपर्क साधून ‘ॲप’मध्ये 600 कोटी रुपये गुंतविले, अशी माहिती निकोल हिने दिली. आज निकोलकडे स्वीय सचिव तसेच उद्योग वाढीसाठी एक स्वतंत्र अधिकारीही आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT