Goa Green Energy Target: हरित उर्जानिर्मितीचे लक्ष्य 2030 पर्यंत पुर्ण करण्याचा निर्धार

वीज मंत्री सुदिन ढवळीकर: खारीवाडा फिशिंग जेटी येथे ट्रोलरवर सौर कुलर यंत्रणेचे उद्घाटन
Sudin Dhavalikar
Sudin DhavalikarDainik Gomantak

(Goa Green Energy Target) वास्को : हरित ऊर्जा निर्मितीचा विचार करणे गरजेचे आहे. गोव्याला हरित उर्जेचे लक्ष्य दिले आहे, ते 2030 पर्यंत पूर्णत्वास आणण्याचा संकल्प मुख्यमंत्री प्रमोद सावंत, स्वतः मी आणि कॅबिनेट मंत्र्यांनी केल्याचे प्रतिपादन वीज मंत्री सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी केले. वास्को खारीवाडा फिशिंग जेटी येथे वेलंकिकनी नक्षत्र या मच्छीमार ट्रोलरवर सौरऊर्जेवर चालणारी कुलर यंत्रणा बसवण्याचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

Sudin Dhavalikar
Goa Land Conversion: जिल्हाधिकाऱ्यांना मिळणार जमीन रूपांतरण प्रकरणे 20 दिवसांनी निकाली काढण्याचा अधिकार

ढवळीकर म्हणाले की, गोव्यात 50 टक्के वीजनिर्मिती ही कोळशामुळे होते तसेच कोळशाला सर्वाधिक विरोध मूरगाव तालुक्यातून होतो. आम्हाला २७० गिगावॅट वीज निर्मिती ही कोळशामुळे मिळते. गोवा राज्य हे प्रत्येक घरात वीज प्रवाह मीटरने देणारे पहिले राज्य आहे. तसेच पाणी व गावागावात हॉट मिक्स रस्ते देणारे राज्य म्हणून अग्रेसर आहे.

वास्कोची वीज समस्या लवकरच संपुष्टात येणार आहे. मार्च 2023 मध्ये भूमिगत काम सुरू होणार आहे. ते लवकरच पूर्ण केले जाईल. सरकारला अखिल गोवा बोट मालकांच्या समस्येची जाणीव आहे. या सर्व समस्या केंद्रीय मंत्र्यांकडे पाठवून त्यावर तातडीने उपाय योजना आखण्याचा प्रस्ताव मांडणार आहे.

मत्स्य व्यवसाय मंत्री नीलकंठ हळणकर म्हणाले, वोकल फॉर लोकल या माध्यमातून आपले सरकार चालत असून सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मच्छीमारी बोट मालकांनी आपल्या समस्या आमच्या पुढे मांडल्या. खारीवाडा येथे मच्छीमारी जेटी बांधण्याचा प्रयत्न आहे. मच्छीमारांसाठी सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे या. वास्को जेटीचा प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Sudin Dhavalikar
Police Constable Raped Minor Girl: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिस काँस्टेबलला अटक

वास्कोचे आमदार दाजी साळकर म्हणाले, खारीवाडा जेटीचा प्रश्न सोडवण्याचा आमचा 100 टक्के प्रयत्न आहे. खारीवाडा जेटी साधन सुविधा नियुक्त बांधली जाईल. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर म्हणाले, लोकसंख्या वाढली आहे. देशाचे भवितव्य सौरऊर्जा आहे.

अखिल गोवा बोट मालक संघटनेचे अध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी स्वागत केले. त्यांनी खारीवाडा जेटी विषयी समस्या मांडल्या. तसेच बोट मालकांच्या समस्यांचे निवारण करण्याचे मागणी मंत्र्यांकडे केली. मच्छीमारांपर्यंत सरकारच्या सुविधा पोहोचत नसल्याची खंत व्यक्त केली.

यावेळी मत्स्य व्यवसाय संचालक शर्मिला मोन्तेरो, सोलर पावर असोसिएशन गोवाचे अध्यक्ष संदीप नाईक, गोवा इलेक्ट्रॉनिक्सचे सदस्य सचिव संजीव जोगळेकर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com