Goa Bribe Case Dainik Gomantak
गोवा

Goa Bribe Case: साल्वादोर द मुंदच्या पंचाविरोधात 18 लाखांची लाच घेतल्याचा गुन्हा

बांधकाम परवान्यासाठी घेतली रक्कम: पोलिस बजावणार समन्स

दैनिक गोमन्तक

Goa Bribe Case:

साल्वादोर द मुंद - पर्वरी येथील सर्वे क्रमांक १५५/५ मधील प्रकल्पाच्या बांधकाम परवान्यासाठी साल्वादोर द मुंदचे पंचसदस्य कृष्णकांत चोडणकर यांनी १८ लाखांची लाच घेतल्याची तक्रार सुनील देसाई यांनी पर्वरी पोलिस स्थानकात दाखल केली होती. या तक्रारीनुसार पर्वरी पोलिसांनी संशयित चोडणकर यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली तसेच धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्याला चौकशीसाठी समन्स पाठवले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

साल्वादोर द मुंद येथील जमिनीचे मालक ऑस्कर ओर्लांदो दो रोझारिओ अथेड यांचे ॲटर्नी असलेले नोएल फेलिक्स अथेड यांनी सुनील देसाई यांना या प्रकल्पाच्या कामासाठी प्रतिनिधी म्हणून अधिकार दिले होते. त्यानुसार सुनील देसाई यांनी सर्वे क्रमांक १५५/५ मधील प्रकल्पाच्या बांधकाम परवान्यासाठी पंचायतीकडे फाईल सादर केली होती.

तक्रारदार देसाई यांनी तिसऱ्यांदा या बांधकाम परवान्यासाठी फाईल पंचायतीकडे सादर केली. या फाईलवर अनेक दिवस उलटूनही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे देसाई यांनी पंचसदस्यांशी संपर्क साधून ही लाच रक्कम कमी करण्यास सांगितले. यासंदर्भात चर्चा होऊन ही लाच रक्कम २१ लाख रुपये देण्यावर तोडगा निघाला.

त्यानुसार देसाई यांनी ५ जून २०२३ रोजी दुपारी १ च्या सुमारास साल्वादोर द मुंद पंचायतीत १८ लाखांची रोख रक्कम पंचसदस्य चोडणकर यांना दिली. त्यानंतर या प्रकल्पासाठीचा बांधकाम परवाना देण्यात आला होता. बांधकाम परवान्यासाठी पंचसदस्याने घेतलेली लाच हा गुन्हा असल्याने तसेच पंचसदस्यांकडून वारंवार अपमानित केले जात आहे. बांधकाम परवान्यानंतर भोगवटा प्रमाणपत्रासाठी पंचसदस्यांकडून पुन्हा सतावणूक होण्याची शक्यता असल्याने तक्रारदाराने पंचसदस्याविरुद्ध पर्वरी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती.

सरपंचांच्या राजीनाम्याची मागणी

साल्वादोर द मुंद पंचायतीचे पंचसदस्य कृष्णकांत चोडणकर यांच्याविरोधात लाच घेतल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली असल्याने सरपंचांनी या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी उपसरपंच रिना फर्नांडिस यांनी केली आहे. याप्रसंगी पंचसदस्य संदीप साळगावकर, दत्ताराम रेडकर, विजय दळवी आणि सामाजिक कार्यकर्ते दीपराज नाईक यांची उपस्थिती होती. पंचायतीत जे घडले आहे, त्याबाबत पोलिसांनी चौकशी करावी.

याप्रकरणात राज्य सरकारने लक्ष घालावे. चोडणकर यांच्यामुळेच आपल्याविरोधात अविश्‍वास ठराव आणला गेल्याचे माजी सरपंच रेडकर यांनी सांगितले. परवान्यासाठी संबंधिताने १८ लाख रुपये कसे दिले असा सवालही त्यांनी केला.

पंचायतीने दोनदा फेटाळला बांधकाम परवाना: पंचायतीने बैठकीत या प्रकल्पासाठी दोनवेळा बांधकाम परवाना फेटाळला होता. या बांधकाम परवान्यासाठी पंचसदस्यांनी ३० लाखांची लाच मागितली होती. तक्रारदार देसाई यांनी ही लाच देण्यास नकार दिला होता. या लाचेच्या बदल्यात पंचायतीला सामाजिक बांधिलकीतून (सीएसआर) शववाहिका देण्याची तयारी त्यांनी दाखविली होती. मात्र, तरीही पंचसदस्याने परवाना मिळणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर तोडग्यासाठी देसाई यांनी संपर्क साधून रक्कम कमी करण्यास सांगितले असता त्या पंचसदस्याने लाच रक्कम २१ लाखांची ठरवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मुंबई इंडियन्सने शेअर केला चिमुकल्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचा व्हिडिओ, फॅन्स म्हणाले, "म्हणूनच हा संघ आमच्यासाठी खास..."

Rama Kankonkar Attack: 'बेल' नाही, 'जेल'च! जेनिटोचा जामीन न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

Gujarat Violence: धार्मिक कार्यक्रमावरून गुजरातमध्ये हिंसाचार; घरांची तोडफोड, 30 वाहने जाळली, 10 जखमी

भुसावळ ते गोवा थेट रेल्वे सेवेची मागणी! मुंबईचा त्रास टळणार; हजारो कोकणवासीयांचा वेळ आणि पैसा वाचणार

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

SCROLL FOR NEXT