तब्बल 5 हजार भाविकांनी केले यज्ञोपवित धारण

एशिया बूक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद : तपोभूमीवरील कार्यक्रमाला मंत्री-आमदारांची उपस्थिती
Goa Culture
Goa CultureDainik Gomantak
Published on
Updated on

कुंडई येथील तपोभूमीवर नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या यज्ञोपवित धारण श्रावणी विधी सोहळ्याला अपेक्षेपेक्षा जास्त ५२०० पेक्षा जास्त भाविकांनी उपस्थिती लावल्याने एशिया बूक ऑफ रेकॉर्डसमध्ये या विक्रमाची नोंद झाली. गोवा ही भोग नव्हे, तर योगभूमी असून गोमंतकीय संस्कृती सर्वदूर पोचली आहे.

Goa Culture
साखळीचा आठवडी बाजार आता दोन दिवस !

गोव्याची एक वेगळी ओळख यज्ञोपवित धारण श्रावणी विधीतून समोर येत असल्याने ती गोमंतकीयांसाठी निश्‍चितच अभिमानास्पद असल्याचे कुंडई तपोभूमीचे पीठाधीश सदगुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी सांगितले.

विशेष म्हणजे, कुंडई तपोभूमीवरील या भव्य विधीची नोंद एशिया बूक ऑफ रेकॉर्डस् तथा इंडिया बूक ऑफ रेकॉर्डसमध्ये बुधवारी नारळी पौर्णिमेच्या दिवशी झाल्याने ही गोमंतकीयांसाठी आनंदाची बाब असल्याचे स्वामीजींनी नमूद केले.

स्वामीजी म्हणाले की, गोव्यातील समृद्ध किनारे हे भोगवादी किंवा चंगळवादी नाहीत, तर या किनाऱ्यांच्या माध्यमातून गोव्याची संस्कृती, अध्यात्म सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत.

Goa Culture
Goa Traffic Rule: गोमन्तक’तर्फे मुलांना रस्ता सुरक्षा मार्गदर्शन

गोव्याची एक वेगळी ओळख पुढील काळात जगभर पोचणार असून संस्कृतीचे एक समृद्ध स्वरूप सर्वांसमोर निश्‍चितच येईल, असे सांगतानाच स्वामीजींनी एशिया बूक ऑफ रेकॉर्डच्या सदस्यांचे आभार मानले.

स्वामीजींना प्रशस्तिपत्र प्रदान

या सोहळ्याला ५२०० पेक्षा जास्त भाविकांनी उपस्थिती लावली. एकाच ठिकाणी, एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावल्यामुळे ही नोंद एशिया बूक ऑफ रेकॉर्डसमध्ये झाल्याचे एशिया बूक रेकॉर्डसचे डॉ. आनंद बिरादर आणि डॉ. फ्रँकलीन डायस या परीक्षकांनी सांगितले.

यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार प्रेमेंद्र शेट, फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक, देश-विदेशातील संत-महंत आणि मान्यवर उपस्थित होते. या विक्रमाची नोंद झाल्याचे प्रशस्तिपत्र स्वामीजींना प्रदान करण्यात आले.

अपेक्षेपेक्षा मोठी उपस्थिती!

या सोहळ्याला तपोभूमीवर ५,२०० पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती होती, असे एशिया बूक ऑफ रेकॉर्डसचे डॉ. आनंद बिरादर यांनी सांगितले. तपोभूमीचे कार्य खूप चांगले असून या कार्यामुळे प्रभावित झाल्याचे त्यांनी नमूद केले. वास्तविक हा विक्रम करायला तीन हजार भाविकांची उपस्थिती एकाच ठिकाणी आवश्‍यक होती, पण या ठिकाणी पाच हजारपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती लाभल्याने ही आनंददायी बाब असल्याचे बिरादर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com