Rape Case Dainik Gomantak
गोवा

Rape Case: धक्कादायक! जंगलात नेऊन 16 वर्षीय तरुणीवर बलात्कार; आरोपी गजाआड

वेर्णाजवळील जंगलात 16 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी साजन कटारिया या 22 वर्षीय तरुणाला कुडतरी पोलिसांनी अटक केली.

दैनिक गोमन्तक

मरगाव : वेर्णाजवळील जंगलात 16 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी साजन कटारिया या 22 वर्षीय तरुणाला कुडतरी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी सध्या वेर्णा येथे राहतो आणि मूळचा उत्तर प्रदेशचा असून तो पीडितेचा दूरचा नातेवाईक आहे.

(16-year-old girl was taken to the forest and raped; Accused Arrested in goa)

“कटारियाने अल्पवयीन मुलीला जंगलात एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी आता तिच्या 11 आठवड्याची गरोदर आहे,” असे कळते की कुटुंबाने सुरुवातीला वेर्णा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली परंतु नंतर हे प्रकरण मैना कुडतरी पोलिस स्टेशनकडे पाठवण्यात आले कारण ते त्यांच्या कार्यक्षेत्रात येते.

पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पीएसआय दीपेश शेटकर यांनी गोवा बाल अधिनियमाच्या कलम 363, 376(8) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायदा 2012 च्या कलम 4, 6 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

वेर्णा येथे कार्यरत वैज्ञानिकावर बलात्काराचा गुन्हा

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अमृतसर हरयाणात येथील महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी सध्या गोव्यात कार्यरत असलेल्या वैज्ञानिकावर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार वेद प्रकाश सोनी असे आरोपीचे नाव असून तो मुळचा प्रयागराज, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असुन, सध्या तो गोव्यातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत वैज्ञानिक आहे. यांच्याविरोधात सध्या अमृतसर, हरयाणात राहणाऱ्या एका 31 वर्षीय महिलेने दाखल केला आहे.

झीरो एफआयआरच्या गुन्हा आधारे दाखल

तो गुन्हा झीरो एफआयआरच्या आधारे दाखल करण्यात आला आहे. त्यावरुन ही कारवाई करण्यात आली. वेर्णा पोलिसांनी आरोपी सोनी यांच्याविरुद्ध कलम 354, 354-ए, 376 कलम 420 अन्वये एफआयआर दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Court: मतिमंद युवतीवर गेस्ट हाऊसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार; शाहजाद शेखचा जामीन फेटाळला

गोव्याला स्वच्छतेचा दुहेरी मान! पणजीसह साखळीला थेट दिल्लीत पुरस्कार; आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Goa Tourism: महिला, लहान मुलांच्या सुरक्षेत हयगय कराल तर खबरदार...; सरकारची हॉटेल्सना सक्त सूचना

Goa Live News: साळ येथील श्री महादेव भूमिका फंडपेटी वादप्रकरणी चौकशी लांबणीवर

Basketball World Championship: गोव्याचा जेशुआ भारताच्या प्रतिनिधित्वासाठी सज्ज, 19 जूलैपासून रंगणार जागतिक विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धा

SCROLL FOR NEXT