Goa BJP: दिगंबर कामत मोदींच्या प्रेमात!

Goa BJP: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामांचा धडाका पाहून मडगावचे आमदार दिगंबर कामत हेसुद्धा मोदींच्या प्रेमात पडले आहेत.
Goa BJP
Goa BJP Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa BJP: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जात, धर्म, भेदभाव न करता केलेल्या विकासकामांचा धडाका पाहून मडगावचे आमदार दिगंबर कामत हेसुद्धा त्यांच्या प्रेमात पडले व गोव्याच्या विकासात आपणही योगदान द्यावे हा ध्यास घेऊनच त्यांनी कुठलीही अट न घालता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नवभारत निर्माण करण्याच्यादृष्टीने देशात अनेक उपक्रम राबवित आहेत. गत 70 वर्षांत न झालेली प्रगती गेल्या दहा वर्षांत भारताने केली आहे. गोव्यानेही गेल्या दहा वर्षांत 22 हजार कोटींची विकासकामे केली, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Goa BJP
Goa Congress: 2,500 समर्थकांसह 'हा' काँग्रेस नेता भाजपात दाखल; गळती थांबेना

मडगावात आयोजित भाजपच्या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात कॉंग्रेसचे मडगाव गटाचे अध्यक्ष गोपाळ नाईक यांनी 2500 कार्यकर्त्यांसह आणि गेली 22 वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस असलेले अनिल झोलापुरे यांनी आपल्या 150 कार्यकर्त्यांसह आज भाजपात प्रवेश केला.

तसेच, यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार दिगंबर कामत, माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, सरचिटणीस नरेंद्र सावईकर व दामू नाईक, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, दक्षिण गोवा जिल्हा भाजपचे अध्यक्ष तुळशीदास नाईक, सचिव सर्वानंद भगत, मडगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष रुपेश महात्मे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, अॅड. नरेंद्र सावईकर, दामू नाईक (Damu Naik) यांनीही विचार मांडले.

पुढील पाच वर्षांत 2 लाख नोकऱ्या

गोवेकर हा जास्त कष्टाचे काम करू शकत नाही. त्यामुळे सरकारने पुढील पाच वर्षांत आदरातिथ्य, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये 2 लाख नोकऱ्यांची तरतूद केली असून त्याचा फायदा गोमंतकीयांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Goa BJP
Cm Pramod Sawant...म्हणून दिगंबर कामत भाजपमध्ये आले; मुख्यमंत्री स्पष्टचं बोलले

मडगावात लवकरच उड्डाण पूल-

मडगावातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी 67 कोटी रुपये खर्चून लवकरच उड्डाण पूल बांधण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com