Verna Crime Dainik Gomantak
गोवा

Verna Crime: वेर्णा येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पीडीत मुलगी गर्भवती...

18 वर्षीय युवकाला पोलिसांनी केली अटक

Akshay Nirmale

Verna Crime: दक्षिण गोव्यातील वेर्णा येथे 15 वर्षीय मुलीवर 18 वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडीत मुलीच्या आईने याप्रकरणी वेर्णा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संबंधित युवकाला अटक केली आहे.

मंगळवारी रात्री पीडीत मुलीच्या आईने तक्रार दाखल केली. जुनैद शेख असे संशयित आरोपीचे नाव आहे. तो मूळचा कासावली येथील आहे. पोलिसांच्या माहितीनुसार डिसेंबरमध्ये लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती.

जुनैद याने संबंधित मुलीसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. पीडीत मुलगी 9 आठवड्यांची गर्भवती आहे. वेर्णा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक दियागो ग्रासियास या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, नुकतेच मायणा कुडतरी येथे एका 14 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. मुलीच्या आईने पोलीसांत तक्रार केली होती. या मुलीला फूस लावून तिचे अपहरण करून कोलवा येथे नेले व शीतपेयात गुंगीचे औषध मिसळून एका हॉटेलात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी संशयिताने मुलीला दिली होती. या प्रकरणातील संशयितालाही अटक केली गेली आहे.

काही दिवसांपुर्वीच पणजी न्यायालयाने 2019 मधील एका प्रकरणात 16 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार आणि अपहरण केल्याप्रकरणी एका व्यक्तीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Helicopter Crash: फ्रान्समध्ये थरार! आग विझवणाऱ्या हेलिकॉप्टरचे तलावात क्रॅश लँडिंग; सुदैवाने जीवितहानी टळली Watch Video

Money Laundering Case: धर्मांतरण रॅकेटचा मास्टरमाइंड छंगूर बाबाच्या साम्राज्यावर ईडीचा घाला! मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 13 कोटींची मालमत्ता जप्त

Viral Video: चांगलीच खोड मोडली! जिवंत कोळंबी खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोरीचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड

Ro-Ro Car Train Service: गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेची पहिली रो-रो कार ट्रेन गोव्यात दाखल, जाणून घ्या भाडे?

Porvorim: ओ कोकेरो ते मॉल दी गोवा रस्ता 5 दिवसांच्या गणेश चतुर्थीनंतरच होणार बंद; CM सावंतांनी केले स्पष्ट

SCROLL FOR NEXT