Visa  Dainik Gomantak
गोवा

Citizenship Migration: 15 लाख भारतीयांनी सोडले नागरिकत्व‌! गोव्यातील आकडेवारी किती? वाचा

International Migration Report: भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक लोकांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले आहे. शिवाय कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, सिंगापूर, जर्मनी यांसारख्या देशांनाही प्राधान्य दिले जाते.

Sameer Panditrao

Goa migration to Portugal statistics

पणजी: गेल्या १० वर्षांत १५ लाख भारतीयांनी नागरिकत्व‌ सोडले आहे. यात गोव्यातील १ लाख नागरिकांचा समावेश आहे. गोव्याच्या रहिवाशांसाठी पोर्तुगीज नागरिकत्व सहज मिळण्याची सुविधा असल्याने मोठ्या प्रमाणात गोमंतकीयांनी हे पाऊल उचलल्याचे मानले जाते.

भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक लोकांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले आहे. शिवाय कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, सिंगापूर, जर्मनी यांसारख्या देशांनाही प्राधान्य दिले जाते.

भारतीय राज्यघटनेनुसार, एकाचवेळी दोन देशांचे नागरिकत्व ठेवण्याची परवानगी नाही. परिणामी परदेशी नागरिकत्व स्वीकारणाऱ्यांना भारतीय नागरिकत्वाचा त्याग करावा लागतो.

भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांसाठी भारत - प्रवास, नोकरी, व्यवसाय यांसाठी सवलती मिळतात.

चांगली जीवनशैली, सुरक्षितता, उच्च शिक्षण, कर सवलती आणि उत्तम नोकरीच्या संधी यांसाठी भारतीय नागरिक परदेशात स्थायिक होणे‌, ही देश बदलण्याची प्रमुख कारणे मानली जातात.

नोकरीचेही आकर्षण

गेल्या दशकात सुमारे १५ लाख भारतीयांनी नोकरीच्या चांगल्या संधींच्या शोधात नागरिकत्वाचा त्याग केला आहे. ही संख्या वर्षानुवर्षे वाढतच आहे. २०२३ मध्ये एकाच वर्षी २.२५ लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले, जी आतापर्यंतची सर्वाधिक नोंद आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने अहवालात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nitin Nabin Goa Visit: ‘भाजप’कडून जय्यत तयारी! कसा होणार 'नितीन नवीन' यांचा गोवा दौरा? वाचा सविस्तर..

Dual Citizenship: "परदेशातील गोमंतकीयांना न्याय द्या"! आमदार सरदेसाईंनी केली दुहेरी नागरिकत्‍वाची मागणी Watch Video

Goa Fraud: 'मी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी बोलतोय'! तोतया ऑफिसरने साधला डाव; कॅफेमालकाला घातला 9 लाखांचा गंडा

Goa News: झेडपी सदस्‍यांना लवकरच मोठी जबाबदारी! पंचायतमंत्री गुदिन्‍होंनी दिली माहिती; पणजीत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

Rashi Bhavishya: शुभकाळ! सर्व इच्छा पूर्ण होणार, थोडी सावधगिरी बाळगा; 'या' राशींचे बदलणार दिवस

SCROLL FOR NEXT