Digital Refund System Dainik Gomantak
गोवा

Amazing Goa सकारात्मक! ‘Digital Refund System’ने वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष; राज्यातील ‘स्टार्टअप’चे 15 स्टॉल

Amazing Goa 2024: गोवा राज्याच्या स्टार्टअप प्रमोशन सेलच्यावतीने सहकार्य करण्यात येणाऱ्या उद्योगांपैकी सुमारे पंधरा स्टॉल अमेझिंग गोवा परिषदेत सहभागी झाल्याने हे एक सकारात्मक पाऊल म्हणावे लागेल.

गोमन्तक डिजिटल टीम

Amazing Goa 2024 Local 15 Startups

पणजी: गोवा राज्याच्या स्टार्टअप प्रमोशन सेलच्यावतीने सहकार्य करण्यात येणाऱ्या उद्योगांपैकी सुमारे पंधरा स्टॉल अमेझिंग गोवा परिषदेत सहभागी झाल्याने हे एक सकारात्मक पाऊल म्हणावे लागेल. आपली उत्पादने देश-विदेशातून येणाऱ्या उद्योजकांपुढे मांडण्याची या नवउद्योजकांना या परिषदेच्या माध्यमातून संधी मिळाली.

या तीन दिवसीय परिषदेत माहिती-तंत्रज्ञान खात्याचा हा स्टार्टअप सेल प्रमोशनचा स्टॉल होता. स्टार्टअप सेलच्या अधिकाऱ्यांनी ‘गोमन्तक''ला सांगितले की, माहिती-तंत्रज्ञान खात्याच्याअंतर्गत स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे. या खात्यात त्यासाठी स्टार्टअप प्रमोशन सेलची निर्मितीही करण्यात आलेली आहे. राज्यात पाचशेच्यावर स्टार्टअप्स सध्या या सेलशी जोडले गेले आहेत. यामध्ये साधारण २४० च्या आसपास महिला स्टार्टअपच्या संचालक म्हणून काम करीत आहेत. यासाठी राज्याच्या स्टार्टअप धोरणानुसार सात योजनांतून त्यांना फायदा दिला जात आहे.

स्टार्टअप्ससाठी आपला उद्योग भरभराटीला जावा म्हणून त्यांच्यासाठी मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातात. त्याशिवाय त्यांच्या शंकाचे निरसन करणे, त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्याचे काम हा सेल करतो. गोव्यात उद्योजक निर्माण व्हावेत, त्यासाठी आवश्यक असणारी आर्थिक मदतही या सेलद्वारे केली जाते. किमान १० वर्षे व्यवसाय करणारे आणि वार्षिक उलाढाल १०० कोटींच्या आत आहे, त्यांच्यासाठी सेलचे मार्गदर्शन फायदेशीर ठरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

नवउद्योजकांना मार्गदर्शन लाभदायी

नवउद्योजकांना कशापद्धतीची गरज आहे, ती पाहून त्यांना ती केली जाते. इंडियन मोबाईल काँग्रेस, अमेझिंग गोवा यांच्यासारख्या प्रदर्शनातून अशा नव उद्योजकांना आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय उद्योगांची ओळख होईल, यासाठी प्रोत्साहन दिले जाते. नव उद्योजकांसाठी स्टार्टअप सेल फायदेशीर असून, त्यांनी या सेवेचे मार्गदर्शन घेतल्यास नक्कीच त्यांच्या उद्योगात त्याचा फायदा होईल, असे सेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘डिजिटल रिफंड सिस्टम’ ठरले प्रदर्शनात लक्षवेधी

उत्तराखंडमध्ये केदारनाथ येथे रुद्रप्रयाग प्रशासनाने पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविलेली ‘डिजिटल रिफंड सिस्टम''साठी यंत्र तयार करणाऱ्या हैदराबादच्या ‘क्लीनटेक स्टार्टअप रिसायकल’ या उपक्रमांतर्गत निर्माण झालेली रिक्लेम प्रो आणि रिक्लेम मिनी अशा यंत्राने प्रदर्शनात लक्ष वेधून घेतले आहे. ‘अमेझिंग गोवा’ प्रदर्शनाच्या शुभारंभाच्या दिवशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आवर्जुन या यंत्राची पाहणी केली.

गोव्यात अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सरकारने धोरणही तयार केले, असल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांना सरकारशी कराराची आशा आहे. अमेझिंग गोवाच्या प्रदर्शनात ‘रिसायकल’चा स्टॉल होता. राज्यात बिअर, टिन, पाणी बाटल्या मोठ्या प्रमाणात तयार होतात, त्यांचे संकलन हे आव्हान आहे. त्यामुळे रिक्लेप प्रो व रिक्लेम मिनी या यंत्रांची सुविधा उपयोगी पडणारी आहे.

...तर मिळणार १० रुपये परतावा

बिअर बाटली, टिन किंवा पाण्याची बाटली या वस्तू विकत घेतल्यानंतर (१० रुपये परतावा देणारी सूचना व क्यूआर कोड असणारे स्टिकर असेल तरच) पुन्हा जिथे यंत्र बसविले आहे, तिथे बाटलीवरील कोड स्कॅन करावे लागते, नंतर ती बाटली यंत्रात टाकून मोबाईल नंबर टाकावा लागतो. ओटीपी आल्यानंतर त्या बाटलीचे १० रुपये त्या ग्राहकास मिळणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damu Naik: काही नेत्यांना ‘प्रसिद्धी स्टंट’ची सवय! दामूंचा भाजप आमदारांना घरचा आहेर; लोबोंवरही निशाणा

Vijai Sardesai: MPA ची दादागिरी, प्रदूषण वाढलेय! विजय सरदेसाईंचा आरोप; ‘जनता दरबार’मध्ये ऐकल्या समस्या

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

GST Council: ‘एक देश एक कर’ला बळकटी देणे गरजेचे! दिल्लीत ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

SCROLL FOR NEXT