Goa Environment Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील 1,461 चौरस कि.मी. क्षेत्र पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील

साठ दिवसात मागवल्या जनतेकडून हरकती

दैनिक गोमन्तक

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने आज एक मसुदा जारी केला आहे, ज्यामध्ये गोव्यातील 1,461 चौरस किलोमीटर क्षेत्र पश्चिम घाट पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (ESA) म्हणून गणले जाणार आहे. असे असले तरी याबाबत येत्या साठ दिवसांच्या आत नागरिकांनी आपले आक्षेप अथवा हरकती ही नोंदवता येणार आहेत. (1,461 square kilometer in Goa as Western Ghats Ecologically sensitive area )

मिळालेल्या माहितीनुसार 8 जुलै रोजी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने एक मसुदा जारी केले आहे, ज्यामध्ये गोवा राज्यातील 1,461 चौरस किलोमीटर क्षेत्र पश्चिम घाट पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (ESA) म्हणून निश्चित केला जाणार आहे. यावर आता केंद्र शासनाने निश्चितीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

समाविष्ट केलेल्या क्षेत्रात प्रामुख्याने सत्तरीमधील सर्वाधिक म्हणजे 56 गावे, कानाकोनामधील 5 आणि सांगेममधील 38 गावे अधिसूचनेच्या कक्षेत येणार आहेत. याबाबत केंद्राने 6 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेद्वारे 56,825 चौरस किलोमीटर क्षेत्र अधिसूचित केले आहे जे गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या सहा राज्यांमध्ये पसरलेले आहे.

साठ दिवसात मागवल्या हरकती

पश्चिम घाट पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून. ही अधिसूचना असलेल्या भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध केलेल्यानंतर साठ दिवसांत नागरिकांना यावर हरकती नोंदवाव्या लागणार आहेत. हा कालावधी संपल्यानंतर केंद्र शासन मसुदा अधिसूचनेचा विचार केला जाणार आहे. त्यामूळे मंत्रालयाने मसुदा अधिसूचनेत समाविष्ट केल्यानंतर प्रस्तावांवर जनतेकडून हरकती किंवा सूचना मागवल्या आहेत.

केंद्र शासनाला अशा प्रकारे आपले आक्षेप किंवा सूचना कळवू शकता

मसुद्यातील अधिसूचनेत समाविष्ट असलेल्या प्रस्तावांवर कोणतेही आक्षेप किंवा सूचना करण्यास स्वारस्य असलेली कोणतीही व्यक्ती ती लिखित स्वरूपात केंद्र सरकारच्या विचारार्थ, पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय, इंदिरा पर्यवरण यांच्याकडे दिलेल्या कालावधीत पाठवू शकते.

भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स,

जोर बाग रोड,

अली गंज,

नवी दिल्ली-110003,

किंवा ई-मेल पत्त्यावर: esz-mef@nic.in,” अधिसूचना सांगते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT