नात्याला काळीमा फासला; भावाकडून सख्ख्या बहिणीवर अतिप्रसंग

सत्तरी तालुक्यातील घटनेने खळबळ; पोलिसांनी आरोपी भावाच्या मुसक्या आवळल्या
Rape in Sattari Goa
Rape in Sattari GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : बहिण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना गोव्याच्या सत्तरी तालुक्यात समोर आली आहे. सख्ख्या भावानेच आपल्या लहान बहिणीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सत्तरी तालुक्यातील एका गावामध्ये ही घटना घडली असून आरोपी भावाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सत्तरी तालुक्यात राहणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणाने आपल्या 19 वर्षांच्या लहान बहिणीवर एकदा नाही तर तब्बल दोनवेळा बलात्कार केला आहे. मागच्या महिन्यात 26 जून रोजी या आरोपीने आपल्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केला. यावेळी बहिणीने भीतीपोटी हा प्रकार कुणासमोर उघड केला नाही. मात्र पहिल्या घटनेनंतर हपापलेल्या भावाने पुन्हा 3 जुलै रोजी बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बहिणीने सुटका करुन घेत झाल्या प्रकाराला वाचा फोडली.

Rape in Sattari Goa
काणकोणमध्ये तुफान पाऊस; रस्ते पाण्याखाली

पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत आरोपी भावाला अटक केली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर दोघा भावा-बहिणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याचा अहवाल समोर आल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. सध्या आरोपी भाऊ पोलिसांच्या ताब्यात असून झाल्या प्रकाराने कुटुंबीयही मोठ्या धक्क्यात आहेत. पीडित तरुणीही शारीरिक आणि मानसिक धक्कातून सावरलेली नसल्याने तिची योग्य ती काळजी घेतली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सत्तरीसारख्या तालुक्यात अशाप्रकारची घटना घडल्याने स्थानिकांमध्येही याचीच चर्चा सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Food Court In Darkness
TCP Act Section 39A Goa
Double Engine Government Goa
Goa Job Scam
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com