Kadamba bus service Dainik Gomantak
गोवा

Kadamba Transport: अखेर संप मागे! दंडाच्या इशाऱ्यापुढे बसचालक नमले

मागण्यांवर विचार करण्याचे कदंब महामंडळाचे आश्वासन

गोमन्तक डिजिटल टीम

Kadamba Transport बंद ठेवलेल्या प्रत्येक बसमागे दर दिवशी 22 हजार रुपये दंड वसूल करणार अशी कडक तंबी कदंब वाहतूक महामंडळाकडून मिळाल्यानंतर नमलेल्या 140 इलेक्ट्रिक बसचालकांनी आज आपला संप मागे घेतला.

महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय घाटे म्हणाले, की महामंडळ हैदराबाद येथील एका कंपनीकडून सेवा घेते. सेवेत खंड पडल्यास दर बसमागे 22 हजार रुपये दंड करण्याची अट त्यांच्याशी केलेल्या करारात घालण्यात आली आहे.

अधिक पगारवाढ मागून कालपासून संपावर गेलेल्या कदंब वाहतूक महामंडळासाठी काम करणाऱ्या 140 इलेक्ट्रिक बसचालकांनी आज सायंकाळी आपला संप मागे घेतला. या चालकांच्या कुठल्याही मागण्या अद्याप मान्य केलेल्या नाहीत.

आधी कामावर रुजू व्हा नंतर मागण्यांवर विचार करू असे आश्वासन त्यांना दिल्यावर त्यांनी संप मागे घेतला, अशी माहिती कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी दिली.

कंपनी प्रतिनिधीच्या वाटाघाटी यशस्वी

हे बसचालक काम करत असलेली कंपनी हैदराबाद येथील असून आज त्या कंपनीच्या प्रतिनिधीने मडगाव येथे येऊन चालकांशी वाटाघाटी केल्या. कामात खोडा घातल्यास दंडाचे पैसे संबंधित चालकाकडून वसूल केले जातील असा इशाराही त्यांना दिला.

त्यापूर्वी सकाळी दंडाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर काही बसचालक कामावर रुजू होण्यासाठी तयार झाले होते, तर काही जणांचा विरोध होता. मात्र, सायंकाळी तो मावळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi Captain: वयाच्या 15व्या वर्षी वैभव सूर्यवंशी बनला कर्णधार! क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय

Goa My Home Scheme: गोमंतकीयांना दिवाळीची भेट! 'माझे घर', मुंडकार हक्कांसह जमीन प्रकरणे दोन महिन्यांत निकाली काढणार

Mohammed Shami Test Cricket Retirement: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; भावनिक पोस्ट करत म्हणाला, 'माझं एकच स्वप्न होतं...'

Goa Politics: निवडणुकीला 3 महिने बाकी, भाजपचा मोठा निर्णय; संकल्प आमोणकर घेणार मंत्रिपदाची शपथ

Horoscope: शनिवारचे राशिभविष्य! मेष, मिथुनसह 4 राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; नोकरीपासून व्यवसायापर्यंत होणार मोठा आर्थिक फायदा

SCROLL FOR NEXT