Goa Sand Mining Dainik Gomantak
गोवा

Sand Mining: मांडवी, झुआरी येथे वाळू उत्खननासाठी १४ ठिकाणे निश्‍चित! पर्यावरण मंजुरीनंतर देणार परवाने

Directorate of Mines and Geology: परवाना मिळणाऱ्या वाळू उत्खनन करणाऱ्यास दरवर्षी एक हजार घनमीटरपर्यंत वाळू उत्खनन करण्याची परवानगी असेल

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्य खाण विभागाने मांडवी आणि झुआरी येथे वाळू उत्खननासाठी १४ ठिकाणे निश्‍चित केली आहेत. यासाठी खाण विभागाने पर्यावरण मंजुरीसाठी अर्ज केला आहे. हा परवाना मिळाल्यावर खाण विभागाकडून पारंपरिक पद्धतीने वाळू उत्खनन करू इच्छिणाऱ्यांना परवाने दिले जातील, असे खाण खात्याने स्पष्ट केले आहे.

राज्य पर्यावरण मूल्यमापन प्राधिकरणानेही या स्थळांची पाहणी केली आहे. परवाना मिळणाऱ्या वाळू उत्खनन करणाऱ्यास दरवर्षी एक हजार घनमीटरपर्यंत वाळू उत्खनन करण्याची परवानगी असेल. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने (एनआयओ) अभ्यास करून खाण खात्याला २० ठिकाणे वाळू उत्खननासाठी सुचविली होती. परंतु त्यातील मांडवी व झुआरी नदीच्या खोऱ्यातील १४ ठिकाणे योग्य असल्याचे आढळले आहे.

ऑनलाइन अर्ज स्वीकारणार

पर्यावरण मूल्यमापन प्राधिकरणानेही पाहणी केल्यामुळे आता लवकरच ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील, असे खाण खात्याने नमूद केले आहे. वाळू उत्खनन सुरू झाल्यानंतर राज्यातील वाळूचा प्रश्‍न सुटणार आहे. त्याचबरोबर वाळूची बेकायदा उत्खनन होऊ नये यासाठी पोलिसांना यावर पाळत ठेवण्याकरिता बंदर कप्तान खात्याच्या बोटी दिलेल्या आहेत. त्याचा पेट्रोलचा खर्च खाण खाते उचलणार आहे. पेट्रोलिंग सुरू राहणार असल्याने तक्रारीही आम्हाला लवकर समजतील आणि कारवाई करणे सोपे होईल. जेवढ्या लवकर उत्खनन सुरू करता येईल, तेवढ्या लवकर ते केले जाणार असल्याचे खाण खात्याचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT