Fraud case Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud Case: प्रोजेक्टमध्ये 'गुंतवणुकीचे' आमिष दाखवून गोव्यातील एकाला 1.32 कोटींचा गंडा; केरळमधील दोघांविरोधात गुन्हा दाखल

1.32 Crore Fraud Case: आर्ले-राय येथील एका नागरिकाची 1.32 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी केरळमधील दोघांविरोधात पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली.

Manish Jadhav

Goa Fraud Case: प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून गोव्यातील एकाची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी केरळमधील दोघांविरोधात गुन्ह्याची नोंद केली. आर्ले-राय येथील रामचंद्र तोपले यांची 1.32 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. पोलिसांनी या दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 318(3) सह कलम 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला. हफसाथ बीवी थाचोली थाझे कुनुयिल आणि हकीम. के अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही केरळमधील कोझिकोड येथील रहिवासी आहेत.

नेमंक प्रकरण काय?

दरम्यान, या प्रकरणातील तक्रारदार रामचंद्र तोपले यांना त्यांच्या "ए कोर दे राय" (A Cor De Raia) नावाच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवण्यात आले. आरोपींनी तोपले यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याचे खोटे आश्वासन दिले. या आश्वासनामुळे तोपले यांनी आरोपींवर विश्वास ठेवून त्यांना वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तब्बल 1 कोटी 32 लाख रुपये दिले. ही रक्कम आरोपींनी तोपले यांच्याकडून फसवणुकीने घेतली. मात्र ठरल्याप्रमाणे गुंतवणूक न करता आरोपींनी तोपले यांना कोट्यवधींचा चुना लावला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रामचंद्र तोपले यांनी मायणा कुडतरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पुढील तपास सुरु

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. सध्या मायणा कुडतरी पोलीस ठाण्याचे पीएसआय (PSI) गौरव नाईक हे या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपी केरळचे रहिवासी असल्याने आणि फसवणुकीची रक्कम मोठी असल्याने पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT