Goa Accident
Goa Accident  Dainik Gomantak
गोवा

Goa Road Accidents: साडेचार महिन्यांत 132 जणांचा अपघात बळी

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Road Accidents 132 Killed: राज्यात रस्ता अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. गत साडेचार महिन्यांत राज्यातील अपघातांचे प्रमाण गेल्यावर्षीपेक्षा घटले असले तरी मृत्यूचे प्रमाण 50 टक्क्यांनी वाढले आहे. दिवसागणिक रस्ता अपघातात एकाचा मृत्यू होत आहे.

यावर्षी आतापर्यंत 1070 रस्ता अपघात घडले असून त्यामध्ये 132 जणांना जीव गमवावा लागला आहे. यामध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण 100 हून अधिक आहे. चालकांमध्ये वाहन नियमांची जनजागृती करूनही हे प्रमाण वाढत असल्याने ही चिंतेची बाब ठरली आहे.

वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार गेल्यावर्षी साडेचार महिन्यात (जानेवारी 2022 ते 15 मे 2022) या 1150 अपघात घडले होते. या अपघातात 81 भीषण, 76 गंभीर तर 196 किरकोळ अपघातांचा समावेश होता.

86 चालकांचा मृत्यू झाला होता तर 94 जण गंभीर जखमी झाले होते. यावर्षी रस्ता अपघाताचे प्रमाण पाहिल्यास भयावह आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात सरासरी ३० पेक्षा अधिक आहे. यामध्ये दुचाकी अपघातांचे प्रमाण अधिक आहे व झालेल्या अपघातात दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे.

२०२२ची आकडेवारी

महिना अपघात मृत्यू

जानेवारी २६० २३

फेब्रुवारी २५१ २१

मार्च २७४ २४

एप्रिल २४२ ११

१५ मेपर्यंत १२३ ७

२०२३ ची संख्या

महिना अपघात मृत्यू

जानेवारी २७२ ३९

फेब्रुवारी २३३ २९

मार्च २४६ ३०

एप्रिल २३१ २५

१५ मेपर्यंत ८८ ९

"दुचाकीस्वार हे अपघातांचे प्रमाण वाढण्यास जबाबदार आहे. हेल्मेट असूनही ते डोक्यात न घालता वाहनाच्या डिकीमध्ये किंवा हातात अडकवले जाते. भरधाववेगाने वाहने चालविली जातात. परिणामी दुचाकीच्या मागील बसलेला उसळून खाली पडतो. त्यामुळे आता सहचालकालाही हेल्मेट सक्ती हाच पर्याय आहे."

- बोसुएट सिल्वा, वाहतूक पोलिस अधीक्षक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT