गोविद गावडे  Dainik Gomantak
गोवा

कोकणी भाषेचा 130 वर्षांचा इतिहास: गोविंद गावडे

'जगाच्या कानाकोपऱ्यात कोणाला पोहोचविण्याचे माध्यम म्हणजे तियात्र आहे'

दैनिक गोमन्तक

पणजी: कोकणी भाषेचा 130 वर्षांचा इतिहास आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात कोणाला पोहोचविण्याचे माध्यम म्हणजे तियात्र आहे. तियात्र कलाकार समाज बदलू शकतात. समाज सुधारणेसाठी काय गरजेचे आहे, याचा विचार लेखकांनी करायला हवा, असे मत कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी येथे व्यक्त केले.

कला अकादमी व गोवा तियात्र अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाच्या सभागृहात आज (रविवारी) तियात्र दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तियात्र अकादमी गोवाचे अध्यक्ष मेनिनो फर्नांडिस, उपाध्यक्ष, मारियो मिनेझिस, कला अकादमीचे कार्यकारी सदस्य डॉ. कॉस्मो फर्नांडिस, ज्येष्ठ तियात्र कलाकार प्रेमानंद सांगोडकर आणि अवितो फर्नांडिस उपस्थित होते.

या कार्यक्रमात मारिया फर्नांडिस, साल्वादोर अफोन्सो, मिंगुएल रॉड्रिग्ज, हॉर्टेंसिओ सलुझिन्हो एडुआर्डो वाझ ए परेरा, जोआओ सिल्वा उर्फ जॉन डिसिल्वा, रमेश कोमरपंत, फेलिसीडेड पी. रेबेलो, झेफेरिनो डायस, केनेथ मायकल थेरेझा झुझार्टे, मेनिनो मारियो अरौजो, जोस अँतानियो अगोस्टिनहो फर्नांडिस, व्हिटोरिनो बी.जे. डी अरौजो या राज्यातील ज्येष्ठ तियात्र कलाकारांचा सत्कार करण्यात आला. तसेच ब गट तियात्र स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले.

थोडा वेळ थांबा, कला अकादमी असेल सर्वोत्तम

राज्यातील कलाकारांसाठी कला अकादमी हे हक्काचे ठिकाण आहे. कला अकादमीचा चेहरा संपूर्णतः बदलून लवकरच ती कलाकारांसाठी खुली करणार असल्याचे कला व सांस्कृतिक मंत्री गावडे यांनी जाहीर केले. माझ्या कारकिर्दीत कलाकारांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असेही ते म्हणाले. चांगल्या गोष्टी करण्यासाठी थोडा वेळ जातो. त्यामुळे थोडा वेळ लागला तरी कला अकादमी सर्वोत्तम होईल, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT