Teachers Dainik Gomantak
गोवा

पाच महिने पगार नसल्याने पेरा शिक्षकांची दिवाळी काळोखातच

पेरा शिक्षकांना जून महिन्यापासून वेतन मिळालेच नाही

दैनिक गोमन्तक

मडगाव: ( Teachers salary ) आपण कधी ना कधी तरी सेवेत कायम होणार या आशेने रक्त आटवत राज्यातील पेरा शिक्षक काम करत आहेत. गोवा राज्यांतील 129 शिक्षकांना कायम होणे दूरच पण मागच्या पाच महिन्यांचा पगारही मिळालेला नाही. त्यामुळे यंदा त्यांची दिवाळी काळोखात जाण्याचीच शक्यता आहे.

(129 Goa teachers not received salary for the last five months)

या संदर्भात गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी ट्विट करून या शिक्षकांच्या समस्येला वाचा फोडली आहे. या शिक्षकांच्या परिस्थितीची जाणीव मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना 14 ऑक्टोबर रोजी करून दिली होती. मात्र अजूनही त्याबद्दल काहीच हालचाल न झाल्याबद्दल खंत व्यक्त करताना या शिक्षकांनी आपली दिवाळी काळोखात साजरी करायची का? असा सवाल केला आहे.

जून महिन्यापासून हे शिक्षक पगारापासून वंचित आहेत. त्यांना शेवटचा पगार एप्रिल आणि मे महिन्याचा मिळाला होता. या संदर्भात शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांना विचारले असता, या शिक्षकांचा पगार मंजूर झालेला असून दिवाळीपूर्वी त्यांना तो मिळावा यासाठी आमचे प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी सांगितले. काही तांत्रिक बाबीमुळे बँकेत हा पगार जमा होऊ शकलेला नाही. असे त्यांनी सांगितले.

पेरा शिक्षकांची नियुक्ती केंद्र सरकारच्या योजनेखाली केली गेली होती, आणि या शिक्षकांना केंद्र सरकारकडूनच पगार मिळायचा मात्र आता केंद्राने हा पगार देणे बंद केले आहे. त्यामुळे त्यांना राज्य सरकारने आपल्या सेवेत सामावून घेतले आहे. मात्र ही सेवा बदल प्रक्रिया किचकट स्वरुपाची असल्याने ही प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागत आहे असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT