Goa Monsoon Canva
गोवा

Goa Rain Update: आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता; पावसाचा सव्वाशे इंचांचा टप्पा पार

Goa Weather: सर्वाधिक ३,९७९.५ मिमी पावसाची नोंद वाळपई येथे, तर दाबोळीत सर्वांत कमी २,४४०.१ मिमी पावसाची नोंद केली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यात पावसाने गेल्या काही दिवसांपासून जोर धरला असून आतापर्यंत ३,१९८.६ मिमी म्हणजेच १२५.९२ इंच पावसाची नोंद केली आहे. सरासरी पावसाच्या तुलनेत ५५.५ टक्के अधिक पावसाची नोंद केली आहे.

गेल्या २४ तासांत एकूण ४५.९ मिमी पावसाची नोंद केली. सांगेत सर्वाधिक १०६.२ मिमी पावसाची नोंद केली आहे. केपेत ८५ मिमी, काणकोण ६४ मिमी, मडगाव ५२ मिमी, फोंडा ४८ मिमी, वाळपई ३९.८ मिमी, पेडणे ३७.४ मिमी, दाबोळी ३३ मिमी, जुने गोवे २८.४ मिमी, साखळी २४.६ मिमी, म्हापशात ७ मिमी पावसाची नोंद केली.

दाबोळी वगळता सर्वत्र पावसाचे शतक

सर्वाधिक ३,९७९.५ मिमी पावसाची नोंद वाळपई येथे, तर दाबोळीत सर्वांत कमी २,४४०.१ मिमी पावसाची नोंद केली आहे. दाबोळी वगळता सर्व केंद्रांवर पावसाने इंचांचे शतक पूर्ण केले आहे. उत्तर गोव्यात ३,३०१ मिमी म्हणजेच १२९.९६ इंच तर दक्षिण गोव्यात ३,१०८.१ मिमी म्हणजेच १२२.३६ इंच पावसाची नोंद केली आहे.

आजही जोरदार बरसणार

कोकण किनारपट्टीत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे, तसेच पश्‍चिम बंगाल येथे चक्रीय वारे वाहत आहे. राज्यात रविवारीही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने गोवा वेधशाळेने ऑरेंज अलर्ट जारी केला अाहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT