Goa Corona Update : राज्यात मध्यंतरी कमी झालेली कोरोनाची स्थिती आता गोव्यासह संपूर्ण देशभरात पुन्हा डोकं वर काढू पाहत आहे. मागील काही दिवसांपासून गोव्यातील रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
(111 new Covid patients added in last 24 hours; Death of one in Goa)
मागील काही दिवस बऱ्याच प्रमाणात घटलेले कोरोना रुग्णांचे प्रमाण पुन्हा हळूहळू वाढू लागले आहे. राज्यात शुक्रवारी कोरोनाचे 111 नवे रुग्ण सापडले असून, राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 812 इतकी झाली आहे. गोव्यात आतापर्यंत 2 लाख 45 हजार 429 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 2 लाख 49 हजार 826 रुग्ण बरे झाले. हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण त्यांना 98.14 टक्के इतके आहे. सध्या राज्यात 812 रुग्ण सक्रिय असून गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 1 मृत्यू झाला असल्याने एकूण मृत्यूचा आकडा 3 हजार 843 आहे. शुक्रवारी 1089 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेतल्या. त्यापैकी 111 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.