मायकल लोबो यांच्या अडचणीत वाढ! दृष्टी कंपनीकडून मानहानीची नोटीस

दृष्टी बीच मॅनेजमेंट कंपनीकडून मायकल लोबो यांना मानहानीची नोटीस बजावण्यात आली आहे.
Michael Lobo has been issued a defamation notice by Drishti Beach Management Company
Michael Lobo has been issued a defamation notice by Drishti Beach Management CompanyDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्या अडचणीत वाढ झाली असुन त्यांना दृष्टी बीच मॅनेजमेंट कंपनीकडून मानहानीची नोटीस बजावण्यात आली आहे. दृष्टी बीच मॅनेजमेंट कंपनीने जाहीर माफी मागावी आशी मागणी करत माफी न मागीतल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला लोबो यांना दिला आहे.

(Michael Lobo has been issued a defamation notice by Drishti Beach Management Company)

Michael Lobo has been issued a defamation notice by Drishti Beach Management Company
टाकी शेल्डे येथे दरड कोसळल्याने स्थानिक रहिवाशांना धोका

मायकल लोबो यांच्यावर कामगारांना संपासाठी चिथावणे, कंपनीविरोधात विधाने करणे तसेच किनारी सुरक्षेत हस्तक्षेप केल्याचा आरोप दृष्टी बीच मॅनेजमेंट कंपनीने केला आहे.

काय आहे दृष्टीची भूमिका

गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर नियुक्त केलेली जीवनरक्षक आणि बचाव संस्था, दृष्टीच्या जीवरक्षक पथकाने या वर्षी आतापर्यंत 218 जणांचे प्राण वाचवले आहेत. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत 223 वेगवेगळ्या घटनांद्वारे 218 बचावकार्य केली आहेत. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असताना राज्‍यात मोठ्या संख्येने पर्यटक येत असून समुद्रात न जाण्याची सूचना ‘दृष्टी’कडून करण्यात आली आहे.

गेल्या सहा महिन्यांत एकूण 2007 मध्ये एकूण 400 हून अधिक बुडण्याच्या घटना घडल्या होत्या, त्यामुळे राज्य सरकारने त्वरित उपाययोजना करून कार्यक्षम यंत्रणा तैनात केली. दृष्टीने राज्यात 2008 मध्ये काम सुरू केले होते. या सेवेमुळे बुडून मृत्यूंमध्ये 99 टक्के घट झाली आहे. दृष्टी जीवरक्षकांच्या बचाव कार्यामुळे तेव्हापासून आतापर्यंत सहा हजाराहून अधिक जीव वाचले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com