Goa Hotel Dainik Gomantak
गोवा

राज्यात 11 हजार बेकायदा हॉटेल्स; कारवाईचे आदेश

या पार्श्वभूमीवर पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी या बेकायदा हॉटेल्‍सवर कारवाईचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्‍यात सुमारे 11 हजार बेकायदा हॉटेल्‍स सुरू असल्‍याचे निवेदन गोवा स्मॉल अँड मीडियम हॉटेलियर्स असोसिएशनने पर्यटन खात्‍याकडे दिले होते. या पार्श्वभूमीवर पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी या बेकायदा हॉटेल्‍सवर कारवाईचे आदेश दिले आहेत.

(11,000 illegal hotels in the goa; Order of action)

याबाबत पत्रकारांशी बोलताना मंत्री खंवटे म्‍हणाले, संबंधित हॉटेल्सची कोणतीही नोंदणी संबंधीत सरकारी खात्‍याकडे नाही. याबाबत गोवा स्मॉल अँड मीडियम हॉटेलियर्स असोसिएशनने पर्यटन खात्‍याकडे तक्रार वजा निवेदन दिले होते. बेकायदा हॉटेल्‍सवर नियंत्रण आणण्यासाठी पर्यटन खात्‍याने यापूर्वीच सर्व आस्थापनांना खात्‍याच्‍या पोर्टलवर नोंदणी करण्यास सांगितले आहे. पर्यटनपूरक व्‍यवसाय करणाऱ्यांसाठी खात्‍याच्‍या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्‍यक आहे. ज्‍या व्‍यावसायिकांना अद्याप नोंदणी केली नसेल त्‍यांनी तातडीने करावी, अन्‍यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.

राज्‍यातील अनेक उद्योजक, व्‍यावसायिक सर्वप्रकारचे सरकारी कर भरत असताना कायदा धाब्‍यावर बसवून व्‍यवसाय करणाऱ्यांची आम्‍ही गय करणार नाही. अशा व्‍यवसायांमुळे राज्‍याचा महसूल बुडतो. सरकारने राज्‍यातील पर्यटनस्‍थळांवर तसेच समुद्र किनाऱ्यांवर बेकायदा आणि अवैध उद्योग-धंदे करणाऱ्यांवर कारवाईचे सत्र अवलंबले आहे. बेकायदा हॉटेल्‍सविषयी माहिती देऊन असोसिएशनने चांगले काम केले आहे, असेही मंत्री खंवटे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT