Canacona accident Dainik Gomantak
गोवा

Goa Electrocution News: डासांची बॅट चार्ज करताना 11 वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; काणकोणमध्ये हृदयद्रावक घटना

Boy Ectrocuted Mosquito Bat: डासांना मारण्यासाठी वापरली जाणारी बॅट चार्जिंगला लावलेली असताना विजेचा धक्का लागून समेश गावंडर या सहावीत शिकणाऱ्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला

Akshata Chhatre

काणकोण: काणकोण तालुक्यातील भाटपाल, नवेवाडा येथे शनिवारी (२८ जून) एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. डासांना मारण्यासाठी वापरली जाणारी बॅट चार्जिंगला लावलेली असताना विजेचा धक्का लागून समेश गावंडर (११) या सहावीत शिकणाऱ्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नेमके काय घडले?

काणकोण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, २८ जून रोजी रात्रीच्या सुमारास समेश आपल्या खोलीत होता. त्याने डासांची बॅट चार्जिंगसाठी एका एक्स्टेंशन बोर्डजवळ लावली होती. ही बॅट काढत असताना अचानक तो एका जीवंत विद्युतवाहिनीच्या संपर्कात आला. यामुळे त्याला विजेचा तीव्र धक्का लागला आणि तो जागीच बेशुद्ध होऊन खाली कोसळला. कुटुंबीयांनी तात्काळ त्याला काणकोण येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर समेशला मृत घोषित केले.

पोलिसांचा तपास आणि वैद्यकीय अहवाल

या घटनेची माहिती मिळताच काणकोण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी इनक्वेस्ट पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

पोलीस सर्जनने दिलेल्या अहवालानुसार, समेशचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला आहे. त्याच्या उजव्या मांडीवर भाजल्याच्या खुणा आढळल्या असून याला विजेचा धक्का लागल्याचा 'एन्ट्री पॉइंट' असल्याचे मानले जात आहे. तसेच, त्याच्या डाव्या पायावरही लहान खुणा होत्या, ज्या विजेचा 'एक्झिट पॉइंट' असावा असा अंदाज आहे. या विजेच्या धक्क्यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa River Marathon: 14 डिसेंबर रोजी रंगणार 'गोवा रिव्हर मॅरेथॉन'! साडेसात हजारांहून जास्त धावपटू होणार सहभागी

Ponda: रितेश नाईकांच्या गळ्यात माळ पडणार का? फोंड्याचा आमदार बिनविरोध निवडण्याची मागणी; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांचे मौन

Goa Politics: खरी कुजबुज; स्वतःला जेम्स बाँड समजणारा पोलिस अधिकारी

Panaji Spa Ban: पणजीत 'स्पा'ना बंदी! अखेर मनपाला आली जाग; नवीन परवानग्या दिल्या जाणार नाहीत

Siolim: वस्तू पळवायला घरात घुसल्या, स्थानिकांनी ठेवले झाडाला बांधून; शिवोलीत 2 परप्रांतीय महिलांना गावकऱ्यांनी घडवली अद्दल

SCROLL FOR NEXT