Curdi Village Goa  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील 'हे' गाव वर्षातील 11 महिने असतं पाण्याखाली...

उन्हाळ्यातील एका महिन्याची वर्षभर वाट पाहतात ग्रामस्थ; आठवणींना मिळतो उजाळा

Akshay Nirmale

Curdi Village Goa: गोव्यातील एक गाव आता पुन्हा चर्चेत आले आहे. हे गाव एकेकाळी अत्यंत सुंदर आणि वनसंपदेने समृद्ध असे गाव होते. पण पाण्याने हे गाव गिळंकृत केले. या गावाचं नाव आहे कुर्डी. गोव्याच्या सांगे तालुक्यातील हे गाव वर्षातील 11 महिने पाण्याखाली असते.

एकेकाळी हे गाव कृषी संस्कृतीने नटलेले होते. झाडी, शेती, घरे, मंदिरे, चर्च, दर्गा, सण-उत्सव, लोकजीवन असे एरवी इतर खेड्यांमध्ये दिसणारी दृश्ये या खेड्यातही दिसून यायची. पण या गावचे हे सौंदर्य आता लुप्त झाले आहे. त्याचे कारण ठरले साळावली धरण.

गोव्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यातील मोठ्या भागाला सिंचन आणि पिण्याचे पाणी पुरविण्याच्या उद्देशाने पुरेसा पाणीपुरवठा करता यावा, यासाठी साळावली धरण बांधण्याचे ठरले. पण, या धरणाच्या पाण्यामुळे कुर्डी गाव पाण्याखाली गेले. साळावली धरण सन 2000 मध्ये पूर्ण झाले.

कुर्डी गाव पूर्णपणे पाण्याखाली जाणार हे लक्षात घेऊन गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांनी गावातील रहिवाशांना शेजारच्या गावात स्थलांतरित करण्याची तरतूद केली. या कुटुंबांना 10 हजार चौरस मीटर शेतजमीन मोबदला म्हणून देण्यात आली.

साळावली ही झुआरी नदीची उपनदी आहे. साळावली नदी कुर्डी गावाची जीवनदायिनी होती. विस्थापित होण्यापूर्वी 2,500 हून अधिक लोक कुर्डीत राहत होते.

भांडी, कपडे, अशा गोष्टी सहज सोबत नेता येतात. पण सोबत नेता येणार नाहीत, अशाही अनेक गोष्टी असतात. आणि आठवणींचे काय? पण या पाण्यामुळे हजरो जीव वाचणार होते, त्यामुळे कुर्डी ग्रामस्थांनी हजारो आठवणी पाण्याखाली बुडू देण्यास मान्यता दिली.

कुर्डीतील लोक 1971 मध्ये विस्थापित होऊ लागले आणि 1975 मध्ये साळावली धरणाचे बांधकाम सुरू झाले. सुरुवातीला, हे विस्थापित गावकरी सरकारने पुनर्वसनासाठी दिलेल्या घरांमध्ये राहत होते. आज ते जवळच्या वाडे गावात राहतात.

जेव्हापासून कुर्डी गाव बुडाले आहे तेव्हापासून ते केवळ एप्रिलअखेर आणि मे महिन्यातच पुन्हा दिसू लागते. हे गाव दिसू लागले की त्यासोबत अनेक आठवणींनाही उजाळा मिळतो. जुन्या गावकऱ्यांना या आठवणी नॉस्टॅलजिक करून टाकतात.

एखादी व्यक्ती अनेक वर्षांनी भेटावी, तशी भावना गावकऱ्यांमध्ये दाटून येते. गाव दिसल्यावर गावकरी गावात येतात. मंदिरात जातात. येथील सोमेश्वर मंदिरात तसेच चॅपेलमध्ये उत्सव साजरा करतात. सोमेश्वर मंदिराचा अर्धा भाग वर्षातील बहुतांश काळ पाण्याखाली जातो.

दर उन्हाळ्यात मात्र सर्व जुने अवशेष दिसू लागतात. गावात अनेक वास्तू अजूनही शांतपणे उभ्या आहेत. येथे पोलिस स्टेशनही होते. तुळशी वृंदावनही दिसून येते. कुर्डी येथे मागे राहिलेल्या या वास्तू आता गोव्याच्या वारशाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत.

दक्षिण गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या या धरणासाठी 'कुर्डीकरांनी' आपल्या भूमीचा त्याग केला होता. या आठवणींना या उन्हाळ्यातही उजाळा मिळाला आहे.

(याबाबतचा मूळ लेख गोमन्तक टाइम्सवर प्रसिद्ध झाला आहे. इंग्रजीतील हा लेख वाच वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT