Porvorim Betting on IPL match
Porvorim Betting on IPL match Dainik Gomantak

Porvorim Betting: पर्वरीत आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश; 14 जणांना अटक

12 संशयित छत्तीसगडचे उर्वरीत युपी, बिहारचे; 25 लाखांचा मुद्देमाल जप्त

Porvorim IPL match Betting: पर्वरी येथे आयपीएल सामन्यांवर बेटिंग घेणाऱ्या परप्रांतीय टोळीचा गोवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 14 संशयित आरोपींना अटक केली आहे. हे सर्वजण मूळचे उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहारचे रहिवासी आहेत. यातील 12 जण छत्तीसगडचे आहेत.

Porvorim Betting on IPL match
Stray Dog Attack: भटक्या कुत्र्यांना कच्चे मांस खायला घालणाऱ्यांना अटक करा; दाजी साळकरांची मागणी

पर्वरीतील विद्या एन्क्लेव्ह येथे डायनेस्टी व्हिला नंबर 1 मध्ये सट्टा घेतला जात होता. राजस्थान रॉयल्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघातील सामन्यावर सट्टा घेतला जात होता. यावेळी पोलिसांनी सर्वांना रंगेहाथ पकडले.

पोलिसांनी रोख 38 हजार रूपये, 47 मोबाईल फोन, 1 लॅपटॉप, तीन LED टीव्ही, 3 नेट राउटर, 3 टाटा स्काय सेट टॉप बॉक्स, एक राउटर मोडेम आणि इतर गेमिंग इलेक्ट्रिकल उपकरणे असा एकूण 25 लाख 38 हजार 000 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Porvorim Betting on IPL match
Stray Dog Attack: भटक्या कुत्र्यांना कच्चे मांस खायला घालणाऱ्यांना अटक करा; दाजी साळकरांची मागणी

रणजित गणेश गेडाम (वय 28 वर्षे), प्रवीण राजपूत सिंग (वय 24), अंकित चंद्रभूषण चौधरी (वय 24), नंदा किशन मुरलीधर दलवानी (वय 54), ज्योतिप्रकाश कौशल रे किशन (वय 38), केशम कुमार विजय यादरो (वय 20), अयाज खान नियामत खान (वय 26), जगदीश अर्जुन वर्मा (वय 24), कवल प्रीतम सिंग (वय 40), पंकज गौतम चौरे (वय 27), मनजीत सिकतान सिंग (वय 41), नितीश बालेंद्र पांडे (वय 19) यांना ताब्यात घेतले आहे.

हे सर्व मूळचे छत्तीसगडचे रहिवासी आहेत. तसेच त्यांचे सहकारी मोहित कुमार ब्रिजदेव तिवारी (वय 28, मूळ राहणार बिहार), राजन राकेश दुबे (वय 23, मूळ राहणआर उत्तरप्रदेश) यांनाही अटक केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com