10th student Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील दहावीचा निकाल पुढील आठवड्यात

शालांत मंडळाच्‍या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात लागणार असल्‍याची माहिती यावेळी भगीरथ शेट्ये यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

गोवा: शालांत मंडळाच्‍या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात लागणार असल्‍याची माहिती यावेळी भगीरथ शेट्ये यांनी दिली. तसेच पुढील शैक्षणिक वर्ष वेळेनुसार सुरू होईल, असेही शेट्ये यांनी सांगितले.

(10th result next week in goa)

गोव्यात बारावीचा निकाल जाहीर

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. यावर्षीच्‍या परीक्षेमध्ये यंदाही मुलींनीच बाजी मारली. यावेळी 94.58 टक्‍के मुली उत्तीर्ण झाल्‍या, तर मुलांची टक्‍केवारी 90.66 अशी आहे.

यापूर्वीही सलग पाच वर्षे मुलींनीच निकालात उच्चांक गाठला आहे. कोरोना महामारीच्‍या पार्श्वभूमीवर पूर्ण झालेल्‍या 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी 50 टक्‍क्‍यांचे सहा महिन्‍यांचे प्रथम सत्र आणि 50 टक्‍क्‍यांचे द्वितीय सत्र अशा दोन सत्रांत परीक्षा घेण्यात आल्‍या होत्या.

यावेळी 1,224 विद्यार्थ्यांना प्रगतीची आवश्‍यकता आहे, तर 105निकाल राखून ठेवले आहेत. या परीक्षेस 21 खासगी विद्यार्थी बसले होते. पैकी 8 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकाल 3810 टक्‍के लागला. आयटीआयमधून 26 विद्यार्थी होते. पैकी 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील 19 उत्तीर्ण झाले.

निकाल 63.33 टक्‍के लागला. 105 दिव्‍यांग विद्यार्थी होते. त्यातील 94 विद्यार्थी उत्तीर्ण

पर्वरी येथील मंडळाच्‍या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी निकालाची घोषणा केली. यावेळी शिक्षण सचिव मेराल्‍डिन मेंडिस, आयटी विभागाचे उपसचिव भरत चोपडे, सहसचिव शीतल कदम उपस्‍थित होते. भगीरथ शेट्ये यांनी ही परीक्षा प्रक्रिया यशस्‍वीपणे पूर्ण करण्यात योगदान दिलेल्‍या सर्व सरकारी खात्‍यांचे तसेच शिक्षक आणि पालकांचे आभार मानले. तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कॉपी करणाऱ्या दोघांवर कारवाई

परीक्षेत कॉपी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना 1 हजार रुपयांचा दंड करण्यात आला. तसेच त्‍यांना संबंधित विषयात शून्‍य गुण देण्यात आले आहेत. त्‍यांच्‍या गुणपत्रिकेत कॉपी केल्‍याचा शेरा मारण्यात आला आहे. हॉल तिकिटावर लिखाण केलेल्‍या एका विद्यार्थ्यास समज देण्यात आली असून त्‍याच्‍या शाळेला त्‍याविषयी कळविले आहे. तर एका विद्यार्थ्याने काळ्या पेनने पेपर लिहिल्‍याचे आढळले. पण संबंधित विद्यार्थी नियमाविषयी अनभिज्ञ असल्‍याचे दिसून आल्‍याने त्‍याच्‍यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: पीर्ण येथे तरुणाचा खून? खुल्या पठारावर मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

Operation Sindoor: 'कोण काय करतं, कधी येतं, सगळं माहीतीये,' ऑपरेशन सिंदूरसाठी भारतीय नौदल सज्ज; व्हाईस ॲडमिरल वात्स्यायन यांचं वक्तव्य VIDEO

LeT terrorist shot dead: हाफिज सईदचा खास माणूस, लष्कर ए तैयबाचा दहशतवादी शेख मोईज मुजाहिदची गोळ्या घालून हत्या; Photo, Video समोर

Australia vs India, 2nd T20: टीम इंडियाचा फ्लॉप शो! मेलबर्नमध्ये 17 वर्षांनंतर पराभव, ऑस्ट्रेलियानं 4 गडी राखत मिळवला विजय

Smriti Mandhana Marriage: शुभ मंगल सावधान! स्मृती मानधना-पलाश मुच्छल यांच्या लग्नाची तारीख समोर, 'या' दिवशी पार पडणार विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT