बोरी पूल, वाहनचालकांसाठी ठरतोय 'मृत्यूचा सापळा'

स्थानिकांकडून नवीन पूल आणि बायपास रस्त्याची मागणी
Borim Bridge is dangerous for motorists
Borim Bridge is dangerous for motoristsDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: वर्दळीच्या बोरीम पुलावरील खड्डे आणि नादुरुस्त पॅच प्रवाशांना त्रासदायक ठरत आहेत, स्थानीक नागरीकांनी त्वरीत दुरुस्तीची मागणी केली आहे. कारण होणाऱ्या विलंबामुळे खड्डे आणि खड्ड्यांचे आकार वाढून वाहनांना विशेषतः दुचाकीस्वारांना आणखी त्रास होईल.

(Borim Bridge is dangerous for motorists)

Borim Bridge is dangerous for motorists
‘अटल सेतू’चे बांधकाम वादात

मोटारसायकलवरून फोंडा ते मडगाव येथे दररोज ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुलावरील खड्डे चुकविताना त्रास सहन करावा लागतो.

बोरी पूल महत्त्वाचा आहे कारण तो उत्तर आणि दक्षिण गोव्याला जोडतो आणि शेजारच्या बेळगाव आणि कारवारची वाहतूकही याच रस्त्यावरून होते. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, अवजड वाहतुकीमुळे खड्ड्यांचा आकार आणि संख्या हळूहळू वाढत आहे.

Borim Bridge is dangerous for motorists
कुडतरी येथे मासेमारी वादावरून स्थानिक आणि शेतकरी यांच्यात हाणामारी

या खड्ड्यांमुळे नियमित वाहतूक कोंडी

मुसळधार पावसात काँक्रीटच्या तळावरील हॉट-मिक्स कार्पेटिंग वाहून गेल्याने रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. पुलावरील रस्ता केवळ काँक्रीट प्री-मिक्सचा बनवावा, अशी स्थानिकांची मागणी आहे.

बोरी पुलावरील जुने कार्पेट काढण्यात आले. तसेच ऑक्टोबर 2021 मध्ये नवीन हॉटमिक्स कार्पेटिंग करण्यात आले होते, परंतु काही ठिकाणी पावसाळ्यापूर्वीच खड्डे पडले आहेत.

स्थानिकांनी सांगितले की, बोरी पुल 30 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता बोरी स्थानिकांना आता बोरी पुलाची दुरुस्ती नको आहे तर नवीन पूल आणि बायपास रोडसह कायमस्वरूपी तोडगा हवा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com