Goa Students Dainik Gomantak
गोवा

Goa: 31 जुलैनंतर सुरू होणार 10 वी, 12 वीचे वर्ग

राज्यात (Goa) 18 वर्षांवरील सुमारे 11लाख 50 हजार नागरिक आहेत. यातील साडेदहा लाख लोकांना लसीचा पहिला डोस (Vaccination) दिला गेला.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात (Goa) आता कोरोनाबाधितांची (Covid-19) संख्या कमी होत आहे. 18 वर्षांवरील 90 टक्के लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस (Vaccination) दिलेला आहे. उर्वरित 10 टक्के लोकांना येत्या 10 दिवसांत लसीचा पहिला डोस दिला जाईल. त्यानंतर 10 वी (10th) 12 वीचे (12th) वर्ग सुरू केले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी केली आहे. (10th and 12th classes in Goa will start after July 31)

राज्यात 18 वर्षांवरील सुमारे 11लाख 50 हजार नागरिक आहेत. यातील साडेदहा लाख लोकांना लसीचा पहिला डोस दिला गेला. उर्वरित 1 लाख लोकांनी पहिला डोस घ्यावा, यासाठी सरकार विविध माध्यामांतून प्रयत्न करीत आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्हिटीचा दरही हा दोन टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे केंद्रीय नियमानुसार शाळा सुरू करणे शक्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

चार महिन्यांनंतर पॉझिटिव्हिटी दर 2 टक्क्यांवर

तब्बल चार महिन्यांनंतर राज्यात कोरोना पॉझिटिव्हिटी दर २ टक्क्यांवर आला आहे. सोबतच कोरोनातून बरे होणाऱ्यांची टक्केवारी 96.34 टक्के वर पोहचली आहे. बुधवारी कोरोनामुळे 5 व्यक्तींचे निधन झाले. 4,427 चाचण्या करण्यात आल्या. त्यतून131 नवे बाधित आढळून आले. तर 122 रुग्ण बरे झाले. एकूण बळींची संख्या 3,118 एवढी आहे. राज्यात सक्रिय रुग्ण 1,413 इतके आहेत.

केंद्राकडून आणखी 5 लाख लसीचे डोस उपलब्ध

केंद्र सरकारने गोव्यासाठी आणखी 5 लाख लसीचे डोस उपलब्ध केले आहेत. त्यामुळे राज्याकडे अद्यापही 7 लाख 31 हजार 140 लसीचे डोस आहेत. राज्यात 18 वर्षांवरील लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असून त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 21 जुलै रोजी दिवसभरात 9,357 लोकांना लस देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT