पणजी: गोव्यातून एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या दहा महिन्यात राज्यात १०९ जणांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. गोवा वैद्यकिय महाविद्यालयाच्या फॉरेन्सिक विभागाने याबाबत माहिती सार्वजनिक केलीय. ०१ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२४ या दहा महिन्याच्या काळातील ही आकडेवारी आहे.
गोव्यासारख्या पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या राज्यात जिथे जगभरातून नागरिक मन:शांतीच्या शोधात येतात. पण, येथील लोक कोणत्या समस्यांचा सामना करतायेत ज्या त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करतायेत असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले तज्ञ आत्महत्येच्या मुळाशी सामजिक दबाव असल्याचे सांगतात.
गोव्यातील शिक्षित लोकांची संख्या आणि सुधारलेली जीवनपद्धती यामुळे येथील लोकांच्या अपेक्षा देखील उंचावल्या आहेत. त्यामुळे वाढत्या अपेक्षा देखील वाढत्या आत्महत्येचे कारण असू शकते, असेही काही अभ्यासक सांगतात. उच्च शिक्षणामुळे अपेक्षा देखील वाढत जातात आणि ज्यावेळी अपेक्षा पूर्ण होत नाहीत, त्यावेळी एकप्रकारे दबाव निर्माण व्हायला सुरुवात होते. अशा दबावाखाली असणारे लोक मग टोकाचा निर्णय घेतात, असे डॉक्टर सांगतात.
साडेचार वर्षांत अपघात पीडितांच्या कुटुंबियांना एकूण 4.3 कोटी रुपये अदा
गोवा सरकारच्या नुकसानभरपाई योजनेंतर्गत 2019 आणि 2024 (जून पर्यंत) दरम्यान अपघातात मृत्यू झालेल्या किंवा अपंग झालेल्या पीडितांच्या कुटुंबियांना एकूण 4.3 कोटी रुपये अदा करण्यात आले. साडेचार वर्षांच्या कालावधीत 261 अर्ज स्वीकारण्यात आले.
गोवा राज्य अपघातग्रस्तांना अपघातात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत पुरवली जाते. राज्य सरकाराने ही योजना 10 फेब्रुवारी 2024 रोजी अधिसूचित केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.