Candidates Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Elections: मुरगावात 101 इच्छुक उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्ज

Panchayat Elections: मुरगाव तालुक्यातील सातही पंचायतीतील १०१ इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले.

दैनिक गोमन्तक

Goa Panchayat Elections: पंचायत निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी मुरगाव तालुक्यातील सातही पंचायतीतील १०१ इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले. एकूण अर्ज संख्या १६५ झाली आहे. मुरगाव तालुक्यात पंचायत निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी १०१ अर्ज दाखल करण्यात आले. यात सर्वाधिक २४ अर्ज कासावली पंचायतीतून दाखल झाले.

निवडणूक अधिकारी कुंदन गडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचायत नामांकनाच्या पाचव्या दिवशी मुरगाव (Murgaon) तालुक्यातील विविध सात पंचायतीमधून एकूण १०१ जणांनी अर्ज दाखल केले. आजचा दिवस कालच्या खूपच व्यस्त होता. कारण अनेक माजी सरपंच व उपसरपंच पंच व काही जणांच्या पत्नीने नामांकन दाखल केले आहे.

दरम्यान, आज नामांकित केलेले सर्वाधिक अर्ज कासावली पंचायतीतून (२४ अर्ज) दाखल झाले. कुठ्ठाळी पंचायतीतून (१२ अर्ज),चिखली पंचायतीतून (२० अर्ज),केळशी पंचायतीतून(०३ अर्ज), वेलसांव- पाले- इसोर्सि पंचायतीतून(१० अर्ज), चिकोळणा पंचायतीतून(१० अर्ज) व सांकवाळ पंचायतीतून(२२ अर्ज) दाखला करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT