Forest News Dainik Gomantak
गोवा

Forest News: चरवणेत वन हक्क समितीच्या ग्रामसभेत 101 दावे मंजूर

ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करून सर्वानुमते ठराव समंत करण्यात आला

गोमन्तक डिजिटल टीम

ठाणे डोंगुर्ली पंचायत क्षेत्रातील चरवणे सत्तरी येथील वन हक्क ग्राम समितीची विशेष ग्रामसभा आज सकाळी चरवणे देवस्थान परिसरात घेण्यात आली. यावेळी ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करून सर्वानुमते ठराव समंत करण्यात आला. त्यात हक्काच्या अंर्तगत चरवणे गावातील ग्रामस्थांनी वन क्षेत्रातील जमिनींचे अधिकार मिळविण्याबाबत लोकांनी अर्ज केले होते.

त्यात 101अर्ज धारक होते. ग्रामसभेत सर्व अर्जावर ठराव मांडून ते सर्वानुमते ठराव संमत करण्यात आले. सदर अर्ज अनेक दिवसांपासून प्रलंबित होते. त्यामुळे आज संपन्न झालेल्या ग्रामसभेत मंजूर झाल्यामुळे लोकांनी समाधान व्यक्त केले.

व्यासपीठावर वन खात्याचे कर्मचारी शालेय गावकर, ठाणे सरपंचा सरिता गावकर, चरवणे वन हक्क समितीच्या अध्यक्षा अंकिता गावस, पंचायत सचिव सर्वेश गावकर, स्थानिक पंच विनायक गावस तसेच इतरांची उपस्थिती होती. ग्रामस्थांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे निवारण करण्यात आले. ग्रामसभेला 350 नागरिकांची उपस्थित होती. स्वागत सरपंच सरिता गावकर हिने केले तर पंच विनायक गावस यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT