कोपार्डे सत्तरी येथील एका खाजगी जमिनीत जंगली प्राण्यांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या सापळ्यात बिबट्या वाघाचा अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघड़कीस आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
यावेळी मिळालेल्या माहिती नुसार आज सकाळी 7 च्या सुमारास कोपार्डे गावातील काही नागिरकांनी रस्त्याच्या बाजुला असलेल्या तालब शेख नामक नागरिकाच्या जमिनीत बिबटा वाघ असल्याची माहिती वन खात्याला मिळाली.
यावेळी वाळपई वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन पाहणी केली असता त्या बिबटाचा मृत्य झालेल्याचे घोषीत केले. सदर बिबटा हा नर असून शिकारीसाठी लावण्यात आलेल्या सापळ्यात अडकून त्याचा मृत्यू झाला असल्याचे समजते.
यावेळी बोलताना सहाय्यक वनपाल विश्वास चोडणकर म्हणाले, सदर सापळा कोणी लावला होता त्याची माहिती मिळू शकली नाही. ही घटना गुरुवार किंवा शुक्रवार सकाळी घडली असावी असा अंदाज आहे.
त्यामुळे हा सापळा कोणी लावला होता याची सविस्तर चौकशी केली जाणार आहे. तसेच दोषींवर कडक शासन केले जातील. ह्या घटनेमुळे एका निश्पाप जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता वन खात्याकडून रात्रीच्यावेळी अशी घटना यापुढे होऊन नये म्हणून खबरदारी घेतला जाणार असुन रात्रीच्यावेळी वनखात्याची गस्त वाढवली जाणार आहे. तसेच यासंबधी जमिन मालकाचीही चौकशी केली जात आहे.
वाळपई वनखात्याने सदर घटनेचा पंचनामा करुन पुढील तपास सुरु आहे. यावेळी वन खात्याचे सुशांत तांडेल, उत्तर गोव्याचे वन अधिकारी, वाळपई सहाय्यक वनपाल विश्वास चोडणकर तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
दोषींवर कडक कारवाई होणार - विश्वजित राणे
राज्याचे वनमंत्री विश्वजित राणे यांनी ह्या घटणेबाबत बोलताना सांगितले की जंगली प्राण्यांसाठी लावण्यात आलेल्या शिकारी सापळा प्रकणी दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे तसेच वन कायदे अजून सक्त केले जातील. काही जणांना वन्यप्राण्यांचे महत्व अजुन माहित नाही. त्यामुळे अश्या कारवाईमुळे शिकार करताना निश्पाप जनांवरांचा जीव जाणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.