Jal Jeevan Mission Dainik Gomantak
गोवा

'100 टक्के हर घर जल' धडधडीत खोटं, मुख्यमंत्र्यांनी दावा सिद्ध करावा; संकल्प आमोणकर

गोमन्तक डिजिटल टीम

काँग्रेस आमदार संकल्प आमोणकर सध्या चांगलेच अॅक्शनमध्ये आल्याचे दिसून येत आहे. बुधवारी त्यांनी वादग्रस्त सिली सोल्स प्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले व स्मृती इराणी यांना वादग्रस्त बारची चौकशी होईपर्यंत मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली. त्यानंतर, आज आमोणकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर निशाना साधत त्यांनी केलेला 'शंभर टक्के हर घर जल' हा दावा धडधडीत खोटं असून, मुख्यमंत्र्यांनी आपला दावा सिद्ध करावा असे आव्हान दिले आहे.

प्रत्येक घराला पाणी पुरवठा करून 100 टक्के 'हर घर जल' प्रमाणित होणारे गोवा पहिले राज्य ठरले आहे. केंदिय मंत्रालयाच्या जल शक्ती खात्याच्या जल जीवन मिशन अंतर्गत गोव्याला हे प्रमाणपत्र मिळाले आहे. अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. यालाच काँग्रेस आमदार संकल्प आमोणकर यांनी आव्हान देत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा 'शंभर टक्के हर घर जल' हा दावा धडधडीत खोटा असल्याचे म्हटले आहे.

'मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपला दावा सिद्ध करावा असे आम्ही त्यांना आव्हान देतो. मुरगाव येथील योजना पूर्णपणे अयशस्वी आहे. तसेच, बहुतांश गोव्यातील घरांमध्ये नळ आहे पण, पाणी नाही अशी अवस्था आहे. मुख्यमंत्र्यांचा हा दावा त्यांनी पूर्वी केलेल्या 100 टक्के हागणदारी मुक्ती सारखाच आहे.' असा टोला संकल्प आमोणकर यांनी लगावला आहे.

हळदोणाचे काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी देखील आमोणकर यांच्या ट्विटला रिट्विट करत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपला दावा सिद्ध करावा असे म्हटले आहे. ग्रामीण भाग सोडा, पण म्हापसा शहरात देखील पाण्याचा तुटवडा आहे असे त्यांनी म्हटले आहे. भाजप आणि गोवा सरकारचा हा नवा जुमला असल्याचा आरोप पणजीकर यांनी केला आहे.

दरम्यान, जल जीवन मिशन अंतर्गत उद्या (19 ऑगस्ट) आयोजित गोव्यातील हर घर जल उत्सव या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतील. सकाळी 10.30 वा. हा कार्यक्रम पार पडणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT