Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: आजोशी-मंडूर पंचायतीत 10 लाखांचा घोटाळा

माजी सरपंच अजित बकाल यांचा आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

सांतआंद्रेतील रेव्हलुशनरी गोवन्स पक्षाच्या (आरजी) हाती असलेल्या आजोशी-मंडूर पंचायतीत सावळा गोंधळ सुरू आहे. उत्तम स्थितीतील गटारांच्या दुरुस्तीची सबब सांगून नव्या बांधकामाची निविदा काढली आहे. सुमारे 10 लाखांचा हा घोटाळा आहे,असा आरोप आजोशी - मंडूरचे माजी सरपंच अजित बकाल यांनी येथे आज पत्रकार परिषदेत केला.

याबाबत पंचायत मंत्री, पंचायत संचालनालय आणि गट विकास अधिकारी (बीडीओ) यांच्याकडे तक्रार सादर केली आहे. गटार बांधकामाच्या निविदेची एकूण प्रक्रिया अवैधरीत्या करण्यात आल्याने ती रद्दबातल करावी, अशी मागणीही बकाल यांनी केली.

विकासकामासाठी पंचायतीत मर्यादित निधी असून याचा वापर आवश्‍यकता असलेल्या कामांसाठी व्हावा. पंरतु निधीचा दुरुपयोग पंचायत मंडळाकडून केला जात आहे.

14 व्या वित्त आयोगाद्वारे निधी मिळणार आहे. नंतर पंचायत मंडळ सरकार विकासकामांसाठी निधी देत नसल्याचे टीका केली जाणार आहे.

मात्र, आजोशी-मंडूर पंचायतीच्या तिजोरीत असलेला निधी कसा संपवावा यासाठी आडमार्गाने पंचायत मंडळ मार्गक्रमण करत आहे, असा आरोप अजित बकाल यांनी यावेळी केला.

कंत्राटदार काळ्या यादीत टाका !

पंचायतीने काही ठिकाणी काम सुरू केली असून निकृष्ट दर्जाची काम केले जात आहे. खडीमध्ये माती असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

पंचायत आरजीची आहे, आमदार, सरपंच, पंच याकडे दुर्लक्ष करत आहेत. निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी बकाल केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका! 8व्या वेतन आयोगाला उशीर; होणार लाखोंचे नुकसान, 'हे' आहे कारण

Tata Tiago 2026: 6 एअरबॅग्ज अन् 15 वर्षांची बॅटरी गॅरंटी; टाटाने अवघ्या 5 लाखांत आणली मिडिल क्लाससाठी बेस्ट कार, मिळतील 'हे' दमदार फीचर्स

Goa Politics: निवडणुकीत चुचकारायचे, नंतर विसरायचे! गोव्यात गेल्या 40 वर्षांपासून मराठी भाषेबाबत खेळलं जातंय घाणेरडं राजकारण!

Pandit Jawaharlal Nehru: आधुनिक भारताचे शिल्पकार! पंडित नेहरुंची 'ती' अखेरची इच्छा; मृत्युपत्रातील उदात्त भावना वाचून तुमचेही पाणावतील डोळे

Belagavi-Goa Highway Accident: बेळगाव-गोवा महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ओव्हरटेकच्या नादात 2 जणांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर

SCROLL FOR NEXT