Accident Cases in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Case: 3 वेगवेगळ्‍या अपघातांत 1 महिला ठार; 2 जखमी

Goa Accident Case: सत्र सुरूच : बार्से, म्‍हापसा, धारबांदोड्यातील घटना

दैनिक गोमन्तक

Goa Accident Case: राज्‍यातील अपघातांचे सत्र काही केल्‍या कमी होत नाहीय. आज बुधवारी झालेल्‍या तीन वेगवेगळ्‍या अपघातांत एक महिला ठार तर दोघे जखमी झाले. पिसर्णे-बार्से, आगशी, म्‍हापसा आणि धारबांदोडा येथे हे अपघात घडले.

पिसर्णे-बार्से येथे झालेल्‍या अपघातात पतीसह दुचाकीवरून काणकोणहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या सुहाना गावकर (५५, श्रीस्थळ-काणकोण) या गंभीर जखमी झाल्याने उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बोलेनो कारने मागाहून येत ओव्हरटेक करण्याच्या नादात त्‍यांच्‍या दुचाकीला धडक दिली. त्‍यात दुचाकीच्या मागे बसलेल्या सुहाना गावकर या गंभीर जखमी झाल्या होत्या.

जाण्याचा प्रयत्न केला. कार ओव्हरटेक करत असतानाच चालकाला अंदाज न आल्याने गाडीचा धक्का दुचाकीला बसला. यामुळे दुचाकीस्‍वार चंद्रकांत यांचा आपल्‍या वाहनावरील ताबा सुटला व दोघेही रस्त्यावर पडल्या.

चंद्रकांत यांना किरकोळ जखमा झाल्या, पण सुवर्णा यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ बाळ्ळी येथील आरोग्यकेंद्रात उपचारांसाठी नेण्यात आले. तेथून त्यांना दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात हलविण्‍यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी कारचालक ग्‍लिसन सर्गेवो फर्नांडिस (२४, रा. आगोंद-काणकोण) याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केलेला आहे. कुंकळ्ळी पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक कविता रावत पुढील तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुहाना गावकर या पती चंद्रकांत गावकर यांच्यासह काणकोणकडून मडगावच्या दिशेने दुचाकीवरून प्रवास करत होत्या. गावकर यांची दुचाकी पिसर्णे-बार्से परिसरातील रस्त्यावर आली असता त्यांच्या मागाहून येणाऱ्या बोलेनो कारने पुढे

हाऊसिंग बोर्ड-म्‍हापसा येथील उतरणीवर चारचाकी गाडी पलटली, सुदैवाने अनर्थ टळला. ब्रेक निकामी झाल्‍याने हा अपघात घडला. दरम्‍यान, धारबांदोडा येथे संजीवनी साखर कारखान्‍याजवळ टेम्‍पो आणि मालवाहू जीप यांच्‍यात समोरासमोर अपघात झाल्‍याने जीपचालक जखमी झाला. त्‍याला हॉस्‍पिसियो इस्‍पितळात दाखल करण्‍यात आले आहे.

कुत्र्याला गाडीखाली चिरडणारा चालक अटकेत

बांबोळी येथील ‘आल्‍दिया दी गोवा’ प्रवेशद्वारातून भरधाव वेगाने बाहेर आलेल्या मर्सिडीज गाडीने रस्त्यावर बसलेल्या कुत्र्याला चिरडल्याप्रकरणी चालक भारत नाटेकर (दिवाडी) याला अटक करण्‍यात आली आहे. त्याच्याविरोधात प्राणिक्रुरता प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा जामीनपात्र असल्याने संशयिताला जामीन देण्यात आला अशी माहिती आगशी पोलिसांनी दिली. चालकाने कुत्र्याला चिरडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्‍यात कुत्रा तडफडताना दिसतोय. पोलिसांनी व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या गाडीच्या क्रमांकावरून चालकाला ताब्यात घेतले. दरम्‍यान, असंख्य प्राणीप्रेमींनी या घटनेचा निषेध केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025 Final: केव्हा, कुठे अन् कधी रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनल सामना? Live मोफत कुठे पाहता येणार?

बॉलिवूडची 'श्री'कन्या, साऊथची 'अचियम्मा'! जान्हवी कपूरच्या 'Achiyyamma' लूकची हवा; राम चरणसोबत गाजवणार दक्षिणी सिनेमा

Valvanti River Flood: नोव्हेंबरमध्ये आला गोव्यातील नदीला पूर; साखळीत वाळंवटी ओव्हरफूल

Goa Today's News Live: डिचोलीत बिबट्याची पुन्हा दहशत

Konkani Drama Competition: फसलेला प्रयोग, पिकिल्ली पानां तुटिल्ली मना; नाट्यसमीक्षा

SCROLL FOR NEXT