Yashasvi Jaiswal Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचा मोठा निर्णय; मुंबईला जय महाराष्ट्र करुन गोव्याकडून खेळणार, MCA कडे मागितली NOC

Yashasvi Jaiswal to leave Mumbai for Goa: गोवा संघ निवडण्यामागचे कारण वैयक्तिक असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती एमसीएच्या सूत्रांनी दिली आहे.

Pramod Yadav

Yashasvi Jaiswal to leave Mumbai for Goa

मुंबई: आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या यशस्वी जयस्वालने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत स्पर्धेत मुंबई संघाकडून खेळणाऱ्या यशस्वीने गोव्याकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मागितले आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, जयस्वालने मंगळवारी (०१ एप्रिल) एमसीएला याबाबत पत्र लिहले आहे. पुढील हंगामात त्यांचा क्रिकेट राज्य संघ मुंबईऐवजी गोवा करण्यात यावा यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मागितले आहे.

'यशस्वी जयस्वाल आमच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र मागितले आहे. गोवा संघ निवडण्यामागचे कारण वैयक्तिक असल्याचे सांगितले आहे', असे एमसीएच्या सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

'यशस्वी जयस्वालच्या जवळच्या लोकांना याबाबत विचारले असता, तो गोवा संघात जाण्याची पुष्टी केलीय', असेही या वृत्तात असेही सांगण्यात आले आहे.

'जे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाहीत त्यांना देशांतर्गत सामने खेळावे लागतील', असे गेल्या वर्षी भारतीय क्रिकेट बोर्डाने सर्व खेळाडूंना निर्देश दिले होते. यशस्वी जयस्वालने मुंबई संघाकडून खेळताना जम्मू आणि काश्मीर विरुद्ध सामन्यात पहिल्या आणि दुसऱ्या डावात त्याने अनुक्रमे 4 आणि 26 धावा केल्या.

मुंबईचा संघ सोडून गोव्यासाठी खेळणारा यशस्वी एकमेव क्रिकेटपटू नाही यापूर्वी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सिद्धेश लाड हेही गोवा संघाकडून खेळले आहेत.

गोवा संघाकडून खेळताना यशस्वीला देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. त्याने अलीकडेच बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. यशस्वीने 2019 मध्ये मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून तो संघासाठी महत्त्वाचा खेळाडू म्हणून समोर आला आहे.

यशस्वी जयस्वालची कारकीर्द

यशस्वी जयस्वालने 36 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 3,712 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 265 आहे. जयस्वालने प्रथम श्रेणीमध्ये 13 शतके आणि 12 अर्धशतके केली आहेत. त्याने लिस्ट ए मध्ये 33 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 1526 धावा केल्या आहेत. यात त्याच्या नावावर 5 शतके आणि 7 अर्धशतके आहेत.

यशस्वी जयस्वालने 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तो भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत आहे. यशस्वीने 19 कसोटी, 1 वनडे आणि 23 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांच्या नावे अनुक्रमे 1798, 15 आणि 723 धावा आहेत. त्याने कसोटीत 4 शतके आणि T20 मध्ये 1 शतक झळकावले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT