Yashasvi Jaiswal Ajinkya Rahane Controversy Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Yashasvi Jaiswal: चालू सामन्यात दाखवला बाहेरचा रस्ता; अजिंक्य रहाणेच्या 'त्या' निर्णयामुळं यशस्वीनं सोडली मुंबई? WATCH VIDEO

Yashasvi Jaiswal Ajinkya Rahane Controversy: भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने एक धक्कादायक निर्णय घेत, देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई ऐवजी आता गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

Sameer Amunekar

भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने एक धक्कादायक निर्णय घेत, देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई ऐवजी आता गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट वर्तुळात या निर्णयाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.

यशस्वी जयस्वालने मुंबईसारख्या मजबूत संघातून बाहेर पडून गोवा संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. यशस्वीने असा निर्णय का घेतला? याबद्दल चर्चा सुरू असतानाच अजिंक्य रहाणेसोबत घडलेल्या एका घटनेमुळं त्यानं मुंबई क्रिकेट संघाला रामराम ठोकल्याचं म्हटलं जात आहे.

अजिंक्य रहाणे हा भारतीय क्रिकेट संघातील एक शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. अजिंक्य रहाणे सध्या टीम इंडियापासून दूर आहे. मात्र, तो रणजी ट्रॉफी आणि इराणी करंडकात मुंबई संघाचे नेतृत्त्व करत आहेत. त्याचे युवा खेळाडूंना मार्गदर्शन फार महत्त्वाचे ठरते.

संघाचे नेतृत्त्व करताना कर्णधाराला कधीकधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. अशाच एका प्रसंगात रहाणेला २०२२च्या दुलीप करंडक अंतिम सामन्यात मोठा निर्णय घेतला. २०२२ मध्ये वेस्ट झोन विरुद्ध साऊथ झोन असा सामना सुरू होता. अजिंक्य रहाणे वेस्ट झोन संघाते नेतृत्त्व करत होता.

या सामन्याच्या शेवटच्या दिवशी यशस्वी आणि साऊथ झोनचा फलंदाज रवी तेजा यांच्यात वाद झाला. पहिल्यांदा ५०व्या षटकात हा वाद झाला. पण रहाणे आणि पंचांनी मध्ये येत हा वाद शांत केला. मात्र ५७व्या षटकात पुन्हा एकदा त्यांच्यात वाद झाला.

दुसऱ्यांना वाद झाल्यानंतर कर्णधार रहाणेने एक मोठा निर्णय घेत, यशस्वीला मैदानाबाहेर पाठवलं. ६५व्या षटकात त्याला पुन्हा मैदानात बोलावण्यात आलं पण हा निर्णय क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला. रहाणेच्या या निर्णयामुळे यशस्वीनं मुंबईसारख्या मजबूत संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT